Uttar Pradesh News | नवरा कामानिमित्त घराबाहेर असताना बायकोचं दुसऱ्यासोबत अफेअर, नवऱ्यानं बायकोचं लावून दिलं बॉयफ्रेंडशी लग्न; अख्खं गाव लग्नासाठी हजर

उत्तरप्रदेश : Uttar Pradesh News | संत कबीरनगरमधील कटोर जोत गावात कल्लू नावाच्या व्यक्तीने त्याच्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराबरोबर लावून दिल्याची घटना समोर आली आहे. कल्लू याचे २०१७ साली गोरखपूर येथील भुलनचक गावातील तौली राम नावाच्या व्यक्तीच्या मुलीशी लग्न झाले होते. कल्लूच्या पत्नीचे नाव राधिका असे आहे.
अधिक माहितीनुसार, पती-पत्नी दोघेही आनंदाने एकत्र राहत होते. त्यांच्या लग्नाच्या ८ वर्षात त्यांना दोन मुलेही झाली. मोठा मुलगा ७ वर्षांचा आहे त्याचं नाव आर्यन आणि एक मुलगी असून तिचे नाव शिवानी आहे. कल्लू कामासाठी अनेकवेळा घराबाहेर राहत होता. कल्लू घरी राहत नसल्याने दरम्यानच्या काळात पत्नी राधिकाचे गावातील तरुणावर प्रेम जडलं.
त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती कल्लूला मिळाली. त्यानंतर कल्लूने राधिकाला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तिने नवऱ्याऐवजी प्रियकराला निवडलं. त्यानंतर या दोघांचा वाद पंचायतीसमोर ठेवण्यात आला. पंचायतीमध्ये पत्नीने प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर पती कल्लूने आनंदाने पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.
त्याचबरोबर मुलांना आपण सोबत ठेवू आणि त्यांचे पालनपोषण करू असेही कल्लूने म्हंटले. कोर्टात नोटरी करून झाल्यानंतर पतीने पत्नीचे तिच्या प्रियकराशी मंदिरात लग्न लावून दिले. दोघांनीही मंदिरात एकमेकांना वरमाला घातली. विशेष म्हणजे या लग्नाला अख्खं गाव उपस्थित होतं.