Vadgaon Maval Pune Crime News | अडीच लाख घेऊन दिलेल्या बनावट ना हरकत पत्रावरुन वन जमिनीचा नोंदविला दस्त; वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधवसह इतरांवर गुन्हा दाखल

fraud

पुणे : Vadgaon Maval Pune Crime News | वडगाव मावळ तालुक्यातील शिवली येथील वन विभागाच्या खाजगी वन जमीन क्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकार्‍याचे ना हरकत प्रमाणपत्राचे (No Objection Certificate) आधारे बेकायदा खरेदी विक्री झालेल्या प्रकरणात वडगाव मावळ पोलिसांनी (Vadgaon Maval Police Station) वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव (Hanumant Jadhav Forest Officer) याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Vadgaon Maval Pune Crime News)

संदीप गोविंद वाळुंज (रा. पाटण, ता. मावळ), वनपरिक्षेत्र कार्यालयातील कपाळी गंध लावणारा इसम आणि इतर अशांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन विभागाच्या ताब्यात आलेल्या शिवले येथील खाजगी वन जमीन गट नं ४४१, ४५०, ४५५, ४५६ या जमीन क्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकार्‍यांचे बनावट ना हरकत प्रमामपत्राचे आधारे बेकायदा खरेदी दस्ताची नोंदणी करण्यात आली होती. संदीप वाळुंज याच्याकडून हनुमंत जाधव याने कार्यालयातील कर्मचार्‍यांमार्फत २ लाख ४० हजार रुपये घेऊन बनावट ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे तपासणीत समोर आले आहे. ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नसतानाही हनुमंत जाधव यांनी ते देऊन शासनाची फसवणूक केली आहे.

याबाबत सहायक वन सरंक्षक आशुतोष गणपत शेंडगे (रा. भांबुर्डा फॉरेस्ट कॉलनी, गोखलेनगर) यांनी वडगाव मावळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वन विभागाकडून संपादित केलेल्या खाजगी वन जमिनीच्या ७/१२ कब्जेदार सदरी भोगवटादाराचे नाव असते़ आणि इतर अधिकारामध्ये महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमास पात्र असा शेरा असतो. वन विभागचे संपादित जमिनीचे कब्जेदार यांना जमीन विक्री करायची असल्यास वन विभागाची लेखी परवानगी घ्यावी लागते.

अशी परवानगी देण्याचे अधिकार वन विभाग प्रमुख यांनाच आहेत.
फिर्यादी यांनी एप्रिल २०२४ मध्ये मावळमधील खाजगी वन जमीन क्षेत्राचा ७/१२ महसुल अभिलेख पाहिला.
त्यात शिवली येथील खाजगी वने संपादनात नियमबाह्य खरेदीदस्त झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांचे जमीन खरेदी विक्री ना हरकत प्रमाणपत्र होते.
जाधव यांना खुलासा करण्याचे आदेश दिले. त्यांनी या ना हरकत प्रमाणपत्रावर त्यांची स्वाक्षरी नसून ते खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे संशय आल्याने खरेदी घेणार्‍यांना तसेच खरेदीदस्तास मान्यता देणारे यांच्याकडे चौकशी करण्यात आली.

त्यात संदिप वाळुंज यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ यांचे कार्यालयात हनुमंत जाधव यांना भेटून त्यांच्या कार्यालयातील कपाळी गंध लावणारा कर्मचारी याच्यामार्फतीने त्यांना २ लाख ४० हजार रुपये
दिल्याने हे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याचे सांगितले.


बनावट ना हरकत प्रमाणपत्राबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी हनुंमत जाधव यांना गुन्हा दाखल करण्याबाबत
लेखी आदेश देऊनही त्यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.
त्यामुळे त्यांच्या कार्यालयातून हे बनावट ना हरकत प्रमाणपत्र दिल्याची फिर्यादी
यांची खात्री झाली. त्यामुळे आता त्यांनी हनुमंत जाधव, संदीप वाळुंज, वनपरिक्षेत्र कार्यालयातील कपाळी गंध लावणारा इसम व इतरांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक कुमार कदम अधिक तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Anjali Damania On Ajit Pawar | राज्याच्या राजकारणात आज मोठा गौप्यस्फोट! अंजली दमानिया म्हणाल्या – अजित पवारांकडे इतका पैसा येतो कुठून?

Maharashtra Assembly Election 2024 | आज विधानसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकणार, महायुती की मविआ? ओपिनियन पोलची धक्कादायक आकडेवारी समोर

Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या मागणीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ती आमची प्राथमिकताच नाही!’

Kondhwa Pune Crime News | सहदेव महंत रामगिरी महाराजांविरोधात कोंढव्यात गुन्हा दाखल; दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

You may have missed