Vadgaon Sheri Assembly Constituency | पंकजा मुंडेंच्या बैठकीला माजी आमदार बापू पठारेंची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पुणे : Vadgaon Sheri Assembly Constituency | लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) होणार आहे. या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असाच मुकाबला असणार आहे. दरम्यान पुण्यातील काही मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडे देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक मतदारसंघात काय स्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी भाजपने जोरदार रणनीती आखली आहे. पक्षाच्या नेत्यांकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी भाजपाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीला अनेक पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
मुंडे यांच्याकडे खडकवासला, शिवाजीनगर या मतदारसंघासह वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंडे यांनी बुधवारी वडगाव शेरी मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी या मतदारसंघातील भाजपाचे सहा ते सात नगरसेवक हे अनुपस्थित होते.
या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले माजी आमदार बापू पठारे (Bapu Pathare)
यांच्यासह भाजपाच्या सहा नगरसेवकांचा यामध्ये समावेश असल्याने भाजपमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दिसून येत नाही.
या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत.
यामध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
माजी आमदार बापू पठारे यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
त्यांच्यासह भाजपाचे माजी नगरसेवक अनिल टिंगरे हे देखील शरद पवार (Sharad Pawar NCP)
यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा