Vadgaon Sheri Assembly Constituency | सरपंच ते आमदार राहिलेले बापूसाहेब पठारे पुन्हा तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात ! बापूसाहेब म्हणाले – ‘वडगाव शेरी मतदार संघातील जनतेचा माझ्यावर विश्वास’
पुणे : Vadgaon Sheri Assembly Constituency | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जवळपास सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनेक चेहरे नवे आहेत तर काहींनी राजकारणातील अनेक पदे यापूर्वी भूषवलेली आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून काल ४५ उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली.
दरम्यान, बहुचर्चित अशा वडगाव शेरी मतदारसंघातून अखेर बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सरपंच ते आमदार असा प्रवास राहिलेले बापूसाहेब पठारे या निमित्ताने पुन्हा एकदा वडगाव शेरीच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
खराडीच्या सरपंच पदापासून बापूसाहेब पठारे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. नंतर ते पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आणि पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरसेवक असताना त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषवले. त्यानंतर २००९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले. (Sharad Pawar NCP)
काही कारणास्तव मधल्या काळात ते एक निवडणुकीपासून लांब राहिले. या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षातही प्रवेश केला. मात्र आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी प्रवेश केला असून यंदा ते तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बापूसाहेब पठारे म्हणाले, “शरद पवारांनी यापूर्वी देखील माझ्यावर विश्वास व्यक्त केला होता
आणि आत्ता देखील विश्वास दाखवला आहे. वडगाव शेरी मतदार संघातील जनतेचाही माझ्यावर विश्वास आहे.
त्यामुळे यंदा वडगाव शेरीतून आमदार मीच असेल”, असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला.
बापूसाहेब पठारे वडगाव शेरी मतदार संघाची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर असेल असेही स्पष्ट केले.
मागील दहा वर्षात वडगाव शेरीतील नागरिकांचे कसे हाल झाले याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वडगाव शेरी मतदारसंघात वाहतूक कोंडीचा ज्वलंत प्रश्न असून तो सोडविण्यावर भर असेल असेही त्यांनी सांगितले. (Vadgaon Sheri Assembly Constituency)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण