Vadgaon Sheri Assembly Constituency | विधानसभेला वडगावशेरी मतदारसंघात तुतारी नेमकं कोण फुंकणार?, उत्सुकता शिगेला

पुणे: Vadgaon Sheri Assembly Constituency | आगामी विधानसभेची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी महायुती आणि महाविकास आघाडीने (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) सुरु केलेली आहे. दोन्हीकडे तीन-तीन पक्ष असल्याने एकाच मतदार संघात इच्छुक उमेदवारांची संख्या जात आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात बंडखोरीची शक्यता असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
दरम्यान वडगाव शेरी मतदारसंघातील वातावरणही रंगतदार होऊ लागले आहे. शरद पवार गटातून अनेकजण लढण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपमध्ये असलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी आतापासूनच तुतारीचा प्रचार सुरु केला आहे. अद्याप त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) प्रवेश झालेला नाही.
अशातच सोमवारी (दि.९) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माजी नगरसेवक अनिल टिंगरे (Anil Tingre) यांची त्यांच्या धानोरीतील निवासस्थानी भेट घेतल्याने टिंगरे हे देखील तुतारीकडून उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली आहे. यामुळेच तुतारीचा उमेदवार नक्की कोण? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वडगावशेरीत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट – Ajit Pawar NCP) सुनील टिंगरे (Sunil Tingre) विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा त्यांच्याकडेच कायम राहील. यामुळे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) , बापूसाहेब पठारे व माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांच्यासह महायुतीमधील इच्छुक नेत्यांची घुसमट वाढली आहे. अशातच विधानसभेला तुतारी नेमकं कोण फुंकणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा