Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी मतदारसंघातील लोहगाव भागात सुनील टिंगरेंच्या पदयात्रेला विजयी रॅलीचे स्वरूप

पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. शहरातील चर्चेत असलेल्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात यंदा रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्हींकडून जोरदार प्रचार सुरु आहे.
दरम्यान महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ लोहगाव भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने जागोजागी झालेले जंगी स्वागत, महिलांची औक्षण करण्याची लगबग, सजवलेल्या बैलगाडीतून आगमन आणि जागोजागी स्वागतासाठी असणारे भले मोठे हार आणि पुष्पवृष्टी हे पदयात्रेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. यावेळी सुनील टिंगरे यांनी नागरिकांशी संवाद साधला.
सुनील टिंगरे म्हणाले, पदयात्रेस नागरिकांची लक्षणीय उपस्थिती पाहून मन भारावून गेले. वडगाव शेरी मतदारसंघात केलेला अतुलनीय विकासावर जनता खुश असल्याचे पदोपदी जाणवले. ही आपली विजयी रॅलीच असल्याची भावना टिंगरे यांनी व्यक्त केली.
या पदयात्रेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी सभापती पांडुरंग आप्पा खेसे,
सूरज चव्हाण, कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांच्या बरोबरच लोहगावमधील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. (Vadgaon Sheri Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Baba Siddique Murder | बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर मारेकरी पसार न होता लीलावती रुग्णालयातच… , पोलीस चौकशीत मोठा खुलासा
Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)
Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’