Vadgaon Sheri Assembly Election 2024 | प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न बूमरँग होतो; केंद्रिय राज्यमंत्री मोहोळ यांचा इशारा
आमदार सुनिल टिंगरेंना विजयी करण्याचे आवाहन
पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | पुणेकर नेहमीच विकासाला आणि भविष्याला मत देतात. कुणी प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास तो बूमरँग होतो, हे लक्षात ठेवा असा इशारा केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी महाविकास आघाडीचे (MVA Candidate) उमेदवार बापू पठारे (Bapu Pathare) यांचे नाव घेता दिला. महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे (Sunil Tingre) शंभर टक्के निवडून येणार आहेत. तुम्ही त्यांना एक लाखांच्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहनही मोहोळ यांनी केले.
वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सुनिल टिंगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मोहोळ बोलत होते. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik), राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, लोहगाव विमानतळाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा लोकसभा निवडणुकीवेळी लोहगावकरांना दिलेला शब्द मी पाळला आहे. केंद्रात त्यावर लवकरच शिक्का मोर्तब होईल. राज्यात महायुतीचे नेते एक दिलाने काम करीत आहेत.
महायुतीचा धर्म पाळून आमदार टिंगरे यांना निवडून देण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील. वारं बदललं आहे. विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे वैयक्तिक टीका केली जात आहे. पदाधिकार्यांनी मनात किंतू परंतु न ठेवता काम करायचे आहे. तुम्ही एका अण्णांना लोकसभेत पाठवले आहे. आता दुसर्या अण्णांना विधानसभेत निवडून द्या. जगदीश मुळीक विधानपरिषद परिषदेवर गेल्यानंतर वडगावशेरीला दोन आमदार मिळणार आहेत.
तर मुळीक यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विरोधक पसरवीत असलेल्या अफवांवर लक्ष देऊ नये. सुनील टिंगरे आणि मी दोघेही महायुतीचे उमेदवार आहोत, असे समजून काम करा असे सांगितले.
सुप्रिया सुळे यांनी पठारेंकडून महिला सन्मानाचा शब्द घ्यायला हवा होता : सुरज चव्हाण
येरवडा येथील सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघातासारखी घटना घडल्यास पठारे यांनी पोलीस स्टेशनला न जाता अपघातग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल, असा शब्द पठारेंकडून व्यासपीठावर घेतला होता. पठारेंकडून असा शब्द घेण्याऐवजी सुप्रिया सुळे यांनी महिलांवर अत्याचार होणार नाहीत आणि झाले तर पोलीस स्टेशनला जाईल, असा शब्द त्यांच्याकडून घ्यायला हवा होता. अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी बापू पठारेंवर केली.
अफवा आणि बिर्याणीला बळी पडू नका : सुनील टिंगरे
अपघात प्रकरणात माझ्या कुटुंबाची आणि माझी विनाकारण बदनामी केली. विनाकारण माझ्या मुलाचे नाव घेतले जात होते. त्यामुळे महाआघाडीच्या तीनही पक्षांना नोटीस दिली होती. पवार साहेबांना नोटीस दिली नव्हती. तुम्ही पातळी सोडली असली तरी मी पातळी सोडणार नाही. मी माझ्या कामांबद्दल बोलतो. तुमच्या खराडी भागात अजूनही टँकर का चालू आहेत याचे उत्तर द्या, असे आव्हान टिंगरे यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, मतदार संघात केलेल्या पंधराशे कोटींच्या विकासकामांचा हिशोब मी माझ्या कार्यअहवालातून मांडला. टीका करणार्यांनीही स्वतःच्या कामांचा लेखाजोखा मांडावा. नाहीतर ट्रोल व्हायची वेळ येते. आमदार असलो तरी लोहगावसाठी मी नगरसेवक बनून कामे केली आहेत. माझ्या निधीतील सुमारे सत्तर टक्के निधी लोहगावला दिला आहे. विरोधकांच्या अफवा आणि बिर्याणीला बळी पडू नका, असे आवाहन टिंगरे यांनी केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”