Vadgaon Sheri Assembly Election 2024 | बापूसाहेब पठारे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज केला दाखल; मोठा जनसमुदाय उपस्थित; 23 तारखेला तुतारी फुंकण्याचा निश्चय

Bapusaheb Pathare

पुणे: Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) माजी आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी आज सोमवार (दि.२८) जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पठारे यांनी पुर्ण मतदारसंघात रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान पठारे समर्थकांनी घोषणाबाजी करत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. यावेळी युवा नेते सुरेंद्र पठारे यांच्यासह हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. त्यामुळे राजकीय खेळी करत शरद पवार यांनी बापूसाहेब पठारे यांना तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. पठारे आपली ताकद पणाला लावून २३ तारखेला तुतारी फुंकण्याचा निश्चय केलेला आहे.

बापूसाहेब पठारे यांची या मतदारसंघात पकड आहे. त्यांचा सरपंच ते आमदार असा प्रवास राहिलेला आहे. मतदारसंघातील मुख्य प्रश्न त्यांना माहित आहेत. आयटी पार्क तसेच विकसीत परिसर असलेल्या या वडगाव शेरीत लोहगाव, खराडी, वाघोलीचा काही परिसर, येरवडा, विश्रांतवाडी चंदननगर असा परिसर आहे.

पठारे यांनी खराडीमधून ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच होत आपल्या राजकीय जीवनास सुरुवात केली.
नंतर ते पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य आणि नंतर पुणे महानगरपालिकेत नगरसेवक
म्हणून निवडून आले. ते स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर २००९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले.

“येथील जनता त्रस्त झालेली आहे. त्यामुळे जनतेने यंदा बापूसाहेब पठारे यांनाच आमदार
करण्याचा निश्चय केलेला आहे. या मतदार संघातून कोणाचे आवाहन नाही”,
असे म्हणत बापूसाहेब पठारे यांनी रणशिंग फुंकलं आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Parner Assembly Constituency | मविआ मेळाव्यात विखेंविरोधात निलेश लंकेंचा हल्लाबोल; म्हणाले – ’50 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागल्याचे 23 तारखेला समजले पाहिजे”

Baramati Assembly Election 2024 | ‘बारामतीकर युगेंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील’, युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे त्यानुसार…’

Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार

Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा

You may have missed