Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वसुबारसच्या मुहूर्तावर बापूसाहेब पठारेंचा उमेदवारी अर्ज दाखल ! शक्तिप्रदर्शन करत येरवडा क्षेत्रीय कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल

येरवडा (पुणे) : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी सोमवारी (ता. २८) महानिर्धार रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. खराडी गाव ते येरवडा क्षेत्रीय कार्यालय या मार्गाने शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान, बापूसाहेब पठारे यांनी सहभागार्थींना संबोधित केले. नागरिकांनी यावेळी मोठा प्रतिसाद दर्शवला.
२००९-२०१४ मध्ये ज्या पद्धतीने वडगावशेरी मतदारसंघात मूलभूत पायाभूत सुविधांची उभारणी करत एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यात यशस्वी ठरलो होतो, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळातही शर्तीचे प्रयत्न करणार आहे. वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न यांसारख्या समस्यांवर प्राधान्याने तोडगा काढणार आहोत. त्याचबरोबर मतदारसंघातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी काम करणार असल्याचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले. (Sharad Pawar NCP)
निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी प्रकाशआप्पा म्हस्के, भिमराव गलांडे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, महादेव पठारे, किशोर विटकर, भैय्यासाहेब जाधव, सुनील मलके, राजेंद्र शिरसाठ, सुनिल गोगले, सचिन भगत, सागर माळकर, मा. नगरसेविका संगीता देवकर, संजीला पठारे, राजू ठोंबरे, रमेश सकट, विल्सन चंदेवळ, आनंद गोयल, नितीन भुजबळ, शांताराम खलसे, राजेंद्र खांदवे, आशिष माने, शैलेश राजगुरू, राजेंद्र उमाप, सुरेंद्र पठारे, नानासाहेब नलावडे, राहुल शिरसाठ, आम आदमी पक्षाचे अमित म्हस्के, आरपीआयचे सचिन खरात यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पक्ष (सचिन खरात गट) व इतर घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार
Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा