Vadgaon Sheri Assembly Election 2024 | धानोरी तसेच पोरवाल रस्ता परिसरातील पाणी प्रश्न सोडवण्याचा बापूसाहेब पठारेंचा निश्चय

Bapusaheb Pathare

धानोरी भागाचे चित्र आमूलाग्र बदलणार; पदयात्रेतून मतदारांशी संपर्क

पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरी मतदार संघातील अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांच्या धानोरी, पोरवाल रस्ता परिसरातील झंझावाती पदयात्रेला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला.धानोरी भैरवनाथ मंदिर- खालची वाडी – विठ्ठल मंदिर – बुद्ध विहार – सिद्धार्थ नगर – ब्रह्मकुमारी केंद्र – मुंजाबा वस्ती – गणपती चौक – स्वप्नील ट्रेडर्स – चौधरी नगर – टिंगरे बंगला – मुंजबा वस्ती – धनेश्वर शाळा असा या प्रचार पदयात्रेचा मार्ग होता.बापूसाहेब पठारे,महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,स्थानिक मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले. तुतारीचा आवाज बुलंद करीत आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जयजयकार करीत पदयात्रेला प्रारंभ झाला.युवती आणि महिलांनी बापूसाहेब पठारे यांचे औक्षण केले तर बापूसाहेब पठारे यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले ,तरुणाईशी संवाद साधला.

वडगाव शेरी मतदार संघात पठारे यांनी पदयात्रांचा धडाका लावला असून मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढला आहे. मतदारांशी थेट संवाद आणि संपर्क साधत ते विजयाचा दावा बुलंद करीत आहेत.मतदारांना नावानिशी ओळखणारे उमेदवार म्हणून त्यांची ख्याती आहे.

मतदारांशी संवाद साधताना बापूसाहेब पठारे म्हणाले,’ मतदारसंघातील खास करून धानोरी मधील विकासाचा अनुशेष भरून काढणार असून सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे.परिसरातील पाणी प्रश्न प्रामुख्याने हाती घेऊन सोडविणार आहे. संपूर्ण प्रभाग टँकरमुक्त करणार आहे . पोरवाल रस्त्यावरील पथदिव्यांची व्यवस्था करणार आहे. लोहगाव, धानोरीला जोडणाऱ्या आणि विकास आराखड्यातील रखडलेल्या पोरवाल रस्त्याच्या उभारणीचे काम वेगाने पूर्ण करणार आहे. पोरवाल रस्ता चौकातील वाहतूक कोंडीचा यामुळे प्रश्न मिटणार आहे . या भागातील नागरिकांचे जीवन सुसह्य करून विकास करणार आहे. ‘

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)

You may have missed