Vadgaon Sheri Assembly Election 2024 | बापूसाहेब पठारे यांची मांजरीमध्ये पदयात्रा; सर्वांगीण विकासाचे आश्वासन

Bapu Pathare

पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | मांजरी गावात आज प्रबळ विकासाचा नारा घेऊन वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार  बापूसाहेब पठारे यांची  भव्य पदयात्रा संपन्न झाली. या पदयात्रेत महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. मांजरी गाव व वडगावशेरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचे आश्वासन पठारे यांनी दिले, ज्यात रोजगाराच्या संधी, मूलभूत सोयीसुविधा, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात प्रगतीचा समावेश आहे.
ही पदयात्रा मांजरी खुर्द गावठाण, पवार वस्ती, माणिक वस्ती, दत्त मंदिर रस्ता, सृष्टी पार्क, मानकाई नगर, माहेर संस्था रस्ता, साई पार्क परिसर अशा विविध मार्गांवरून निघाली, आणि या मार्गावर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी बापूसाहेब पठारे (BapuSaheb Pathare) यांचे नागरिकांनी हार-फुलांनी स्वागत केले.

बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेचा उद्देश म्हणजे मांजरी गाव व वडगावशेरी मतदारसंघात विकासाचे एक नवे पर्व सुरू करणे आहे. “माझं गाव, माझं कर्तव्य” या भावनेने प्रेरित होत, मांजरीच्या आणि वडगावशेरीतील प्रत्येक नागरिकाला प्रगतीचा भागीदार बनवण्याचे आश्वासन पठारे यांनी दिले. ते म्हणाले, “माझा एकच संकल्प आहे – मांजरी आणि वडगावशेरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास. माझं गाव, माझं कुटुंब. मी तुम्हाला दिलेल्या आश्वासनांचा मान राखीन.”

पदयात्रेच्या दरम्यान, बापूसाहेब पठारे यांनी नागरिकांचे थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. त्यांनी गावात स्वच्छता, पाण्याचा योग्य पुरवठा, चांगले रस्ते, महिलांसाठी सुरक्षा, तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.  प्रमुख उद्दीष्ट आहे मांजरी व वडगावशेरीच्या विकासाला गती देणे आणि स्थानिकांना एक उत्कृष्ट जीवनमान उपलब्ध करणे,असे त्यांनी सांगितले

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Assembly Election 2024 | महायुतीतील ‘पुरंदर’च्या लढ्याचे लोन ‘हडपसर’मध्ये पसरण्याची शक्यता !

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’चा पैलवान सिकंदर शेख 2024 चा रुस्तुम-ए-हिंद ! किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा कुस्तीपटू

Raj Thackeray | पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी भूमिका; राज ठाकरेंनी घेतली दखल; कारवाईचे संकेत

You may have missed