Vadgaon Sheri Assembly Election 2024 | सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ वडगावशेरी मतदासंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची समन्वयाची महाबैठक, प्रचाराचा आढावा घेऊन उर्वरित प्रचाराबाबत जगदीश मुळीक यांच्या सूचना

Vadgaon Sheri Assembly

पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. दरम्यान मतदानासाठी एक आठवडाच बाकी आहे. सभा, बैठका, रॅली, प्रचारयात्रा यांचा धडाका उडाला आहे. शहरातील चर्चेत असलेल्या वडगावशेरी मतदारसंघातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्या प्रचारार्थ वडगावशेरी मतदासंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची समन्वयाची महाबैठक (दि.११) पार पडली.

या बैठकीत आतापर्यंत झालेल्या प्रचाराचा आढावा घेऊन उर्वरित प्रचाराबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजप नेते जगदीश मुळीक यांनी मार्गदर्शन करत प्रचारात व्यक्तिगत गाठीभेटी, प्रभागात घरोघरी जाणे आणि पदयात्रांचे नियोजन करणे तसेच पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात काम करण्याच्या सूचना दिल्या. त्याच्यासोबतच मतदारसंघात विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत कोणीही विश्वास ठेवू नये आणि संपूर्ण ताकतीने महायुतीच्या विजयासाठी काम करावे असे सांगण्यात आले.

टिंगरेनगरच्या तिरूपती गार्डन येथे झालेल्या या बैठकीला भाजप नेते जगदीश मुळीक (Jagdish Mulik),
भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, प्रकाश भालेराव,
शैलेंद्र मोरे, सुनिल जाधव, अशोक कांबळे,सतिश मस्के यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँगेस पक्ष, शिवसेना,
आरपीआय आठवले गट तसेच महायुतीतील अन्य घटक पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Vadgaon Sheri Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”, सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”

Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार

Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ

You may have missed