Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगाव शेरी मतदारसंघात दोन बापू पठारे निवडणुकीच्या रिंगणात; शरद पवारांच्या पक्षाकडून जोरदार हल्लाबोल, सुरेंद्र पठारे म्हणाले…
पुणे: Vadgaon Sheri Assembly Election 2024 | शहरातील वडगाव शेरी मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) उमेदवार सुनील टिंगरे (Sunil Tingre NCP) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांच्यात सामना होणार आहे. बापूसाहेब पठारे यांच्या पक्ष प्रवेशावेळी शरद पवार यांनी टिंगरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. (Vadgaon Sheri Assembly Election 2024)
तुतारी (Tutari) चिन्हावर बापूसाहेब पठारे हे उमेदवार असताना वडगांव शेरी मतदारसंघातून अजून एका बापू बबन पठारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने वडगांव शेरी मतदारसंघात दोन बापू पठारे झाले आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवार बापू बबन पठारे यांवर शरद पवारांच्या पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
वडगाव शेरी मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार बापू पठारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काल अहिल्यानगर जिल्ह्यातील मांडवगन गावातील बापू बबन पठारे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अपक्ष उमेदवार बापू पठारे यांच्या उमेदवारी अर्जावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे.
याबाबत सुरेंद्र पठारे म्हणाले, ” आमचे प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारांना आताच त्यांचा पराभव दिसल्याने त्यांनी असा डमी उमेदवार उभा केला आहे. कालच आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नातेवाईकांकडून एक डमी उमेदवाराला श्रीगोंदा येथून आणलं आणि त्याचा उमेदवारी अर्ज भरला आहे. आज अर्जाची छाननी असून आम्ही त्या अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे.
या उमेदवाराच्या अर्जात अनेक त्रुटी आहेत. तसेच निवडणूक अधिकारी यांच्याकडून देखील उमेदवाराच्या अर्जाची एफिडेविट सार्वजनिक करण्यात आलेली नाही. या अपक्ष उमेदवाराने त्याच्यावर असलेल्या कर्जाची अर्जात माहिती दिलेली नाही. तसेच बँकेतील पैसे देखील नमूद नाही म्हणून आम्ही आक्षेप घेतला आहे. असं यावेळी सुरेंद्र पठारे यांनी सांगितलं.
निवडणूक अधिकारी सचिन बारवकर म्हणाले , “आज छाननीला सुरुवात झाली आहे.
त्यामध्ये आत्तापर्यंत २३ उमेदवारांची छाननी झाली असून २४ वा उमेदवार बापू बबन पठारे
यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्या अर्जाची छाननी झाली आहे आणि त्यांचा अर्ज वैद्य ठरविण्यात आला आहे.”
बापू बबन पठारे यांचा उमेदवारी अर्ज आज वैद्य ठरविण्यात आल्याने आत्ता वडगाव शेरी मतदारसंघात
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापू पठारे
आणि अपक्ष उमेदवार बापू पठारे हे दोन्ही नाव समान असल्याने मतदारांमध्ये गोंधळ पाहायला मिळणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत
Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा