Vadgaon Sheri Assembly Election 2024 | लोहगावमध्ये आमदार रोहित पवार यांच्या प्रचार पदयात्रेचे तूफान; म्हणाले – ‘बापूसाहेब पठारे यांना एक लाखाचे मताधिक्य द्या’
गुन्हेगारी संपवू, बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू : रोहित पवार
पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (Sharad Pawar NCP), महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून निवडणूक लढवणारे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी आमदार रोहित पवार यांच्या तुफानी प्रचार पदयात्रेने आणि जाहीर सभेने राजकीय वातावरण ढवळून काढले.
पठारे यांनी आपल्या प्रचारात जोरदार गती दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या ८ नोव्हेंबर च्या सभेपाठोपाठ दि. ९ नोव्हेंबर रोजी लोहगाव परिसरात आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत प्रचार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले .’उच्चांकी मतदानाने बापूसाहेब पठारे निवडून येतील आणि वडगाव शेरीत नवा राजकीय इतिहास घडविला जाईल’,असे उद्गार आमदार रोहित पवार यांनी काढले. पदयात्रेच्या शेवटी जाहीर सभा झाली आणि आमदार पवार यांनी आक्रमकपणे विरोधकांचा समाचार घेतला.
रोहित पवार म्हणाले,’काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात विकास होत होता.तो भाजपने थांबवला.येणाऱ्या कंपन्या दिल्लीत मुजरा करणाऱ्यांनी गुजरात मध्ये हलवल्या.त्यामुळे इथल्या होतकरू तरुणाईवर अन्याय झाला.१५ लाख युवा दरवर्षी नोकरी,रोजगार शोधत फिरत असतो.हे पाहून शांत बसू नका,लढायला हवे.बुथवर लक्ष द्या.आपले सरकार येत आहे,६० हजार कोटींचा भ्रष्टाचार उकरून काढू.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात मलिदा खाऊन पुतळा पडणार असेल, तर हे पाप कोणाचे ? असाही प्रश्न रोहित पवार यांनी विचारला.
‘फडणवीस हे सर्वात खोटे बोलणारे नेते आहेत.ते महाराष्ट्र्राचा फसवत आहेत.ते जनरल डायर आहेत. ते अभिमन्यू नाहीत.
ते तरुणांना,महिलांना न्याय देऊ शकले नाहीत. चक्रव्यूहातून सोडवू शकले नाहीत.
या चक्रव्यूहातून फक्त शरद पवार हेच सोडवू शकतात.सामान्य जनता हीच त्यांची ऊर्जा आहेत.
महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी ते लढत आहेत. १७० आमदार महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत.
गुजरातशाही इथे येऊ देणार नाही. सभेची वीज घालविणाऱ्याची वीज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून घालवू.
विरोधकांचे आम्ही बारा वाजवू.’असाही घणाघात रोहित पवार यांनी केला.
‘रामकृष्ण हरी,वाजवू तुतारी ‘,’शरद पवार साहेबआगे बढो’.’महाविकास आघाडी आगे बढो ‘
अशा घोषणा त्यांनी उपस्थित समुदायाला द्यायला लावल्या,त्याला अर्थातच प्रचंड प्रतिसाद मिळाला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!
Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)