Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरीतील मविआचे उमेदवार बापूसाहेब पठारेंच्या प्रचारार्थ निलेश लंकेंची जाहीर सभा; सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या बापूसाहेब पठारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन
पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदारसंघातील राजकीय वातावरण रंगतदार होऊ लागले आहे. यंदा वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरु आहे.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. मतदानाची तारीख जशी जवळ येते आहे तसा लोकांचा उत्साह आणि प्रेम वाढतच चालले आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. यावेळी सभेला मोदी गर्दी उसळली होती.
निलेश लंके म्हणाले, भाजपने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडले. उतारवयात शरद पवार यांना दुःख दिले. त्यामुळे लोकसभेत महायुतीला फटका बसला. म्हंणून त्यांनी आता लाडकी बहीण योजना आणली आहे. रात्री अपरात्री सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या बापूसाहेब पठारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन लंके यांनी यावेळी केले.
“विधानसभेत निवडून आल्यानंतर मतदारसंघातील पाणी प्रश्नांबरोबरच इतरही सर्व विकासकामे पूर्ण करू”, असे आश्वासन यावेळी बापूसाहेब पठारे यांनी दिले. (Vadgaon Sheri Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”