Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी मतदारसंघात बापूसाहेब पठारे यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; म्हणाले – “सुंदर,स्वच्छ, विकसित वडगाव शेरीचं स्वप्न साकारण्यासाठी नागरिकांचा वाढता पाठींबा”

Bapu Pathare

पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी कमी कालावधी उरला आहे. सभा, बैठका,पदयात्रा, रॅली या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. यंदा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढत होणार आहे.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांनी मतदारांना प्रत्यक्ष गाठीभेटीवर जोर दिला आहे. ते थेट मतदारांशी संवाद साधत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मविआचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी (दि.१३) मतदारसंघातील स्वामी समर्थ मंदीर, मते नगर, श्रमसाफल्यनगर, समता सोसायटी, साई नंदनवन, दिगंबर नगर या परिसरात पदयात्रेचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांकडून पठारे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. नागरिकांनी मांडलेले प्रश्न-समस्या आपण भविष्यात नक्की सोडवू ,असा विश्वास बापूसाहेब पठारे यांनी दिला.

बापूसाहेब पठारे म्हणाले, “सुंदर, स्वच्छ, विकसित वडगाव शेरीचं स्वप्न साकारण्यासाठी नागरिकांचा वाढता पाठींबा मिळतो आहे
आणि आमच्या वाढत्या जबाबदारीची जाणीव आम्हाला मतदार संघातील नागरिक करून देत आहेत”,
अशी भावना पठारे यांनी व्यक्त केली. (Vadgaon Sheri Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)

Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

You may have missed