Vadgaon Sheri Assembly Election 2024 | मविआचे उमेदवार बापूसाहेब पठारेंच्या प्रचारार्थ पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; म्हणाले – “वडगावशेरीचा चेहरामोहरा बदलून महापरिवर्तन घडवून आणण्याचा ध्यास जनतेने घेतला आहे”
पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी आता दोनच दिवसांचा कालावधी उरला आहे. सभा, बैठका, रॅली या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. यंदा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढत होणार आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना असणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शहरात अधिकचा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील टिंगरे (Sunil Tingre) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ (दि.१५) मतदारसंघात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा श्री सिद्धीविनायक मेंटल क्वार्टर, राजीव गांधी नगर, रणकपूर दर्शन, शांतीनगर, पोरवाल पार्क, कतारवाडी भारतनगर, पोलीस वसाहत, फुलेनगर, राम सोसायटी, हरी गंगा, करुणा सोसायटी, पर्णकुटी सोसायटी, अहिल्या सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, इंदिरा नगर याप्रमाणे पार पडली. यावेळी महिलांनी औक्षण करत बापूसाहेब पठारे यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. पदयात्रेदरम्यान नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.
बापूसाहेब पठारे म्हणाले, वडगावशेरीचा चेहरामोहरा बदलून महापरिवर्तन घडवून आणण्याचा ध्यास जनतेने घेतला आहे.
परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न अडचणी समजून घेत त्यावर भविष्यात मात करू,
असे आश्वासन दिल्याचे पठारे यांनी सांगितले. (Vadgaon Sheri Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”