Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगाव शेरीत बापूसाहेब पठारे यांचे बेरजेचे राजकारण; मामा-भाचे पुन्हा एकत्र

पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) प्रवेश केल्यानंतर वडगाव शेरीवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळविण्यासाठी माजी आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. मागील काही वर्षांपासून दुरावलेले भाचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष संतोष भरणे (Santosh Bharne) आणि पठारे यांची दिलजमाई झाली आहे. मामा-भाचे पुन्हा एकत्र आले आहेत.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत पठारे-भरणे जोडी वडगाव शेरीत चर्चेत होती. पठारे यांच्या प्रचाराची धुरा भरणे यांनी सांभाळली होती. संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याने पठारे यांचा विजय सुकर झाला होता. त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीतही पठारे यांनी या भागातील सर्व प्रभागांवर एकतर्फी वर्चस्व मिळविले.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत मात्र भरणे आणि पठारे यांचे संबंध दुरावले. उमेदवारीसाठी डावलले जात असल्याची भावना झाल्याने संतोष भरणे यांनी वेगळी वाट धरली. शिवसेनेत प्रवेश करून पठारे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात पॅनल उभे केले.
बापूसाहेब पठारे २०१९ ची विधानसभा निवडणूक लढले नाहीत. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतर महायुतीच्या जागावाटपात ही जागा मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना उमेदवारीही जाहीर झाली. (Vadgaon Sheri Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण