Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : बापुसाहेब हे सामान्यांचे आधार – खासदार नीलेश लंके

Nilesh Lanke

वडगावशेरीचा चेहरा मोहरा बदलेन: बापूसाहेब पठारे

वडगावशेरी : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी मतदार संघाचे महविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार (MVA Candidate) बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांच्या प्रचारासाठी आयोजित परिवर्तन महासभेत अहिल्यादेवीनगरचे खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी घणाघाती भाषण करुन पठारे यांच्या विजयाचे आवाहन केले. 50 हजार मतांनी ते निवडून येतील, हे विश्वासाने सांगितले.

महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. संविधानाची प्रत पठारे यांना भेट देण्यात आली. अनेक व्यक्ती, संघटनांनी पाठिंब्याचे पत्र दिले. वडगावशेरी हा मिनी इंडिया असून तो आदर्श करु, अशा भावना विविध वक्त्यांनी व्यक्त केल्या. मारुती गलांडे यांनी आभार मानले.

नीलेश लंके म्हणाले, या परिसराचे परिवर्तन व विकास हा बापूसाहेब पठारे यांनीच केला.

संकट समयी आधाराचे केंद्र बापूसाहेब पठारे यांनी निर्माण केले. नगरचे नागरिक येथे मोठया प्रमाणावर मतदार आहेत. ते तुतारी लाच मतदान करतील. खरे कार्यसम्राट बापूसाहेब आहेत, सामान्यांचे ते आधारवड आहेत. शरद पवार यांना झालेल्या त्रासाची भरपाई केली पाहिजे. सत्तारूढ लोक लबाड आहेत, महविकास आघाडी सत्तेवर येणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे. पुढे शेतकरी, महिला, बेरोजगार वर्गासाठी काम करु.

बापूसाहेब पठारे म्हणाले, प्रतिस्पर्धी उमेदवार खोटारडा आहे . त्यांनी 10 कोटीची कामे दाखवावी,1500 कोटीची भाषा करु नये. पवार साहेब हे आमचे दैवत आहे. टँकर वापरल्याचा आरोप करणाऱ्यांनी पाण्याचा कधीच प्रश्न सोडवला नाही. आपण जिंकणार आहोत. आणि चांगले परिवर्तन या मतदारसंघात घडवणार आहोत. (Vadgaon Sheri Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed