Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली द्वारे नागरिकांशी संवाद

Sunil Tingre

पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) सुनील टिंगरे (Sunil Tingre) तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

२० नोव्हेंबरला मतदान असल्याने आता प्रचारासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ (दि.१५) संजय पार्क ते रामवाडी ह्या मार्गावर बाईक रॅली च्या माध्यमातून प्रचार करण्यात आला.

ह्या रॅलीच्या निमित्ताने विविध धार्मिक स्थळांना भेट देत टिंगरे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जागोजागी सुनील टिंगरे यांचे नागरिकांकडून उस्फुर्त स्वागत करण्यात आले. यावेळी मतदारांमध्ये मोठा जोश – उत्साह पाहायला मिळाला.

सुनील टिंगरे म्हणाले, ” बाईक रॅली च्या माध्यमातून मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला.
उस्फुर्त स्वागत आणि त्यांच्यातील जोश – उत्साहात विजयाची भावना दिसून आली.” (Vadgaon Sheri Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed