Vadgaon Sheri Assembly Election 2024 | तूतारी वाजवणाऱ्या माणसावरच शिक्का,माझा विजय पक्का; महाविकास आघाडीचे बापूसाहेब पठारे यांनी केली प्रचाराची सांगता

Bapu Pathare

वडगाव शेरी : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) वडगाव शेरी मतदार संघातील अधिकृत उमेदवार (MVA Candidate) यांनी प्रचाराची सांगता करताना विजया बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. तुतारी (Tutari) वाजवणाऱ्या माणसाच्या निवडणूक चिन्हावरच जास्तीत जास्त शिक्का पडणार असून माझा विजय पक्का आहे,आमचे दैवत शरद पवार महाविकास आघाडीचा प्रचार आणि मी राबवलेली नियोजनबद्ध प्रचार मोहीम याला यश मिळाले असल्याचे प्रतिपादन बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांनी प्रचाराची सांगता करताना सांगितले.

निष्क्रिय आणि बदनाम उमेदवाराविरुद्ध आम्ही आवाज उठवला आणि आम्हाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला.सोबतीला स्थानिक प्रश्न देखील आम्ही जोरात उपस्थित केले. मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेत्यांची उपस्थिती, तळागाळात केलेल्या पदयात्रा आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळे माझा विजय निश्चित झाला आहे,असेही त्यांनी सांगितले.

मतदार संघाबाहेरचे कोणतेही भावनिक प्रश्न आणि द्वेष निर्माण करणाऱ्या मोहिमा या विधानसभा मतदारसंघात चालल्या नाहीत,कारण हा विधानसभा मतदारसंघ मिनी इंडिया आहे आणि त्यांना सुरक्षित आणि प्रगतिशील कारभार देण्याचा निर्धार आम्ही केला आहे,असे त्यांनी आवर्जून सांगीतले. सर्वांचे आभार त्यांनी मानले आणि निकोप लोकशाही, संविधान प्रणित विकासाचा कारभार यासाठी सुजाण मतदार म्हणून मतदान करण्याचे आवाहन केले

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed