Vadgaon Sheri Assembly Election 2024 | महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचार दरम्यान महिलांचा उस्फुर्त सहभाग; म्हणाले – ‘आगामी काळातही मतदारसंघाचा विकास साधणे, जनतेचे प्रश्न सोडवणे हेच ध्येय’

पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून राज्यभर प्रचारसभा, प्रचारफेऱ्यांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. नेत्यांच्या बैठकी, सभा, रॅली, पदयात्रा सुरु आहेत. सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.
वडगावशेरी मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढतीत महायुतीकडून सुनील टिंगरे (Sunil Tingre) तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांच्यात सामना असणार आहे. दरम्यान दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढण्यावर भर दिला आहे. नागरिकांची भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधला जात आहे.
दरम्यान (दि.१६) टिंगरेनगर भागातील प्रचारा दरम्यान महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी नागरिकांची भेट घेत संवाद साधला. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून टिंगरे यांच्या कामाचे विशेषत: भामा आसखेड प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक करत पुन्हा एकदा विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
सुनील टिंगरे म्हणाले, विधानसभेत जाऊन मतदारसंघाचा विकास साधणे, जनतेचा प्रश्न सोडवणे हेच ध्येय उराशी बाळगले आहे.
मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आगामी काळात मार्गी लावू असे आश्वासन यावेळी सुनील टिंगरे यांनी दिले. (Vadgaon Sheri Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”