Vadgaon Sheri Assembly | सुषमा अंधारेंच्या उमेदवारीसाठी पुण्यात फ्लेक्स; पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी
पुणे : Vadgaon Sheri Assembly | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून इच्छुक उमेदवार पक्ष नेतृत्वाकडे भेटीस जाताना दिसत आहेत. तसेच मतदारसंघात सभा, बैठका सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी लढत आपणाला पाहायला मिळणार आहे. दरम्यान महायुती आणि मविआ मध्येही जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशातच आता पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना उमेदवारी मिळावी यासाठी येरवडा भागात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावण्यात आले आहेत. ‘उच्चशिक्षित निर्भीड कणखर व्यक्तिमत्व वडगावशेरी मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी एकच उत्तम पर्याय’, असे मजकूर असलेले फ्लेक्स अनेक भागात लावण्यात आले आहेत.
यामुळे आता अंधारे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांपैकी हडपसर (Hadapsar Assembly), वडगावशेरी आणि कोथरूड (Kothrud Assembly) हे मतदारसंघ ठाकरे गटाला महाविकास आघाडीच्या जागावाटपावेळी मिळावेत अशा अपेक्षा अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. त्यामुळे पुण्यातून महाविकास आघाडीमार्फत महिलांना संधी दिली जाईल का हे पाहावे लागणार आहे.
या फ्लेक्सबाबत ठाकरे गटाचे पुणे शहर उपप्रमुख आनंद गोयल म्हणाले, पुणे शहर आणि जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठ्या प्रमाणावर ताकद आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना निवडणूक लढवण्याची संधी द्यावी, अशी मागणी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत.
मागील दीड वर्षाच्या कालावधीत सुषमा अंधारे यांनी ससून रुग्णालय ड्रग्स प्रकरण ते कल्याणीनगर अपघात घटनेला वाचा फोडण्याचे काम केले आहे.
त्यामुळे एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने सुषमा अंधारे यांना उमेदवारी द्यावी अशी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी आहे.
या निवडणुकीत सुषमा अंधारे प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद