Vaibhav Suryavanshi | 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा भारतात दरारा; गुगल सर्चमध्ये विराट कोहलीलाही टाकले मागे

Vaibhav Suryavanshi | 14-Year-Old Vaibhav Suryavanshi Takes India by Storm, Overtakes Virat Kohli in Google Searches

Vaibhav Suryavanshi | दुबईमध्ये सुरू असलेल्या अंडर-१९ आशिया कपमध्ये भारताच्या युवा संघाने दमदार सुरुवात केली आहे. दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने युएईविरुद्ध तब्बल ४३३ धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ९५ चेंडूत १४ षटकारांसह १७१ धावांची ऐतिहासिक खेळी साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्यासोबत आरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रा यांनी प्रत्येकी ६९ धावा केल्या.

या शानदार कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशी केवळ मैदानावरच नव्हे, तर डिजिटल विश्वातही चर्चेत आला आहे. २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च होणाऱ्या भारतीयांमध्ये वैभवने थेट विराट कोहलीलाही मागे टाकल्याचे समोर आले आहे. एका मुलाखतीदरम्यान प्रसारकाने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर वैभवने संयमी प्रतिक्रिया देत, “मी अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही, माझं पूर्ण लक्ष खेळावरच असतं,” असे सांगितले.

युएईविरुद्धच्या सामन्यातील १७१ धावा ही अंडर-१९ आशिया कपमध्ये भारतीय फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. वैभवच्या या खेळीच्या जोरावर भारताने युएईचा २३४ धावांनी दणदणीत पराभव केला. नऊ चौकार आणि १४ षटकारांसह त्याने गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. सध्या वैभव सूर्यवंशी हा भारतातील सर्वाधिक गुगल सर्च होणाऱ्या व्यक्तींमध्ये पहिल्या क्रमांकावर असून, त्यानंतर प्रियांश आर्य, अभिषेक शर्मा, शेख रशीद आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचा क्रमांक लागतो.