Vaman Mhatre | महिला पत्रकाराला आक्षेपार्ह बोलणे अंगलट, वामन म्हात्रेंना अटक होणार?, कल्याण कोर्टाचा दणका

Vaman Mhatre

बदलापूर : Vaman Mhatre | बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार (Badlapur Case) करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधासाठी बदलापूरमध्ये पालक आणि नागरिकांनी उग्र आंदोलन सुरु केले. यावेळी तब्बल ११ तास रेल्वेसेवा रोखून धरण्यात आली. या घटनेचे वार्तांकन अनेक पत्रकार करत होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून प्रत्येक घटनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत होते. (Anticipatory Bail Rejected)

या घटनेचे पहिल्यापासून वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी धमकी दिली. तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावर बलात्कार झाला आहे, अशी भाषा वामन म्हात्रे याने महिला पत्रकाराला वापरली होती.

त्यानंतर वामन म्हात्रे यांच्या या भाषेचे तीव्र पडसाद उमटले होते. सामाजिक संघटनांनी आणि विरोधी पक्षांनी त्यांच्या अटकेची मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकपूर्व जामिनासाठी म्हात्रे यांनी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र आता कल्याण न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे वामन म्हात्रेंना अटक होणार अशी चर्चा सुरु आहे. (Vaman Mhatre)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना