Vande Bharat Express | वंदे भारतची पावसात झाली वाईट आवस्था, धबधब्यासारखे छतातून पडत होते पाणी, रेल्वेने केली सारवासारव
नवी दिल्ली : Vande Bharat Express | दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेसच्या छतातून पाणी लीकेज झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातील लोकांनी रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त केला. यानंतर रेल्वेने तातडीने खुलासा करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. रेल्वेने म्हटले की, पाईपात तात्पुरता अडथळा निर्माण झाल्याने डब्ब्यात पाणी गळत होते.
तत्पूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक युजर्सने दिल्लीहून वाराणसीकडे जात असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस (२२४१६) च्या छतातून पाणी गळत असल्याचा व्हिडिओ शेयर केला होता. व्हिडिओत दिसत आहे की, ट्रेनच्या डब्यात धबधब्यासारखे पाणी गळत आहे. एक यूजरने लिहिले की, यामुळे मला प्रयागराज ते वाराणसीपर्यंत उभ्याने प्रवास करावा लागला. (Vande Bharat Express)
यानंतर रेल्वेने खुलासा करत म्हटले की, पाईपमध्ये तात्पुरता अडथळा आल्याने कोचमध्ये थोडे पाणी गळले. ट्रेनच्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा ते दुरूस्त केले. यामुळे झालेल्या झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर