Vanraj Andekar Murder Case | वनराज आंदेकर खून प्रकरणात पिस्तुल पुरविणाऱ्यास अटक

पुणे : Vanraj Andekar Murder Case | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात आरोपींना पिस्तुल पुरविणार्यास गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. (Pune Crime Branch)
अभिषेक ऊर्फ आबा नारायण खोंड Abhishek Alias Aba Narayan Khond (वय २४, रा. लक्ष्मीगार्डन सोसायटी, देशमुख वाडी, शिवणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत (Pune Police MCOCA Action) कारवाई करण्यात आली असून अद्यापपर्यंत २१ जणांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान आबा खोंड याने आरोपींना पिस्तुल पुरविण्यास मदत केल्याचे समोर आले होते.
पोलीस अंमलदार निलेश साबळे, दत्ता सोनवणे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खोंड हा घरी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवणे येथील त्याच्या घराजवळ सापळा रचला. तो घरी येताच त्याला ताब्यात घेतले. त्याला २५ सप्टेबर रोजी रात्री अटक करण्यात आली. (Vanraj Andekar Murder Case)
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त निखील पिंगळे (DCP Nikhil Pingle), सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (ACP Ganesh Ingle) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शबीर सय्यद (Sr PI Shabbir Sayyad), पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे (PSI Avinash Lohote), सहायक फौजदार राहुल मखरे, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, निलेश साबळे यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’