Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून ! जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Vanraj Andekar Murder Case

पुणे : Vanraj Andekar Murder Case | आंदेकर टोळीचा (Andekar Gang) म्होसक्या बंडू आंदेकर (Bandu Andekar) याचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या रविवारी रात्री गोळीबार करुन आणि कोयत्याने वार करुन निर्घुण खून करण्यात आला (Pune Murder Case). कौटुंबिक वादातून हा खून करण्यात आला असल्याचे पोलीस (Pune Police) तपासात निष्पन्न झाले आहे. वर्चस्वाच्या वादातून जावयानेच या खूनाचा कट रचल्याचे सांगण्यात येत आहे.

https://www.instagram.com/reel/C_Z0rsiJdtk/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

गणेश कोमकर (Ganesh Komkar) हा आंदेकर यांचा जावई. त्याला नाना पेठेतील (Nana Peth Pune) एक दुकान दिले होते. महापालिकेने (Pune Municipal Corporation – PMC) अतिक्रमण कारवाईमध्ये हे दुकान पाडले. त्यानंतर कुटुंबामध्ये वादाला सुरुवात झाली. आंदेकर कुटुंबाच्या आर्शिवादानेच गणेश कोमकर हा गुंडगिरी करीत होता. गणेश कोमकर याने स्वत:ची गँग तयार केली होती. आंदेकर यांच्या एका नातेवाईकाचा शनिवारी गणेश कोमकर याच्यासोबत वाद झाला होता. त्यात गणेश याला मारहाण झाली होती. त्याचा रागही गणेश याला होता. आंदेकर कुटुंबाकडून आमच्या जीवाला धोका आहे, असा अर्ज कोमकर कुटुंबाने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) नुकताच दिला होता. ही सर्व पार्श्वभूमी वनराज आंदेकर याच्या खुनामागे असल्याचे दिसून येते. (Murder In Nana Peth Pune)

https://www.instagram.com/p/C_ZqLsSvWiZ

गणेश कोमकर याने यापूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख (Rajabhau Parekh) यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला होता (Acid Attack). वनराज आंदेकर याला आपल्यावर हल्ला होऊ शकतो, याची जाणीव होती. त्यामुळे तो सतत आपल्या टोळीतील मुलांच्या घोळक्यात वावरत असे. रविवारी घरगुती कार्यक्रम असल्याने त्याच्याबरोबर मुले नव्हती. घरातील कार्यक्रम संपल्यानंतर तो रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोके तालीम (Doke Talim Pune) जवळील अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला होता. त्याच्याबरोबर एक नातेवाईकही होता. त्याचवेळी ५ ते ६ दुचाकीवरुन १० ते १२ हल्लेखोर आले. त्यांच्यापैकी एकाने आंदेकर याच्यावर एका पाठोपाठ ५ गोळ्या झाडल्या. त्यानंतर काही जणांनी कोयत्याने सपासप वार केले. त्यात आंदेकर जागेवरच कोसळला. एका मिनिटात झालेल्या या घटनेनंतर दुचाकीवरुन आलेले सर्व हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर लोकांनी वनराज आंदेकर याला जखमी अवस्थेत के ई एम रुग्णालयात नेले (KEM Hospital Pune). तेथे त्याचा तपासणीपूर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

https://www.instagram.com/p/C_YaceiPW64

या घटनेची माहिती मिळताच सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील (Pravinkumar Patil IPS) यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.

https://www.instagram.com/p/C_YkEARJkxe

वनराज आंदेकर हा कुख्यात गुंड आणि आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू आंदेकर यांचा मुलगा होता. वनराज आंदेकर हा पुणे महापालिकेच्या निवडणुकीत २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आला होता. त्याआधी त्याची आई राजेश्री आंदेकर या २००७ आणि २०१२ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.

जावयाचा नेम चुकला मग कोयत्याने केले ठार

वनराज आंदेकर याच्यावर जावई गणेश कोमकर याने एका पाठोपाठ ५ गोळ्या झाडल्या.
परंतु शवविच्छेदनात वनराज याला गोळ्या लागल्या नसल्याचे दिसून आले.
गोळीबारनंतर कोयत्याने जे वार केले गेले, त्यात आंदेकर याचा मृत्यु झाला. (Vanraj Andekar Murder Case)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed