Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्या गुन्हेगाराला अटक
पुणे : Vanraj Andekar Murder | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करणारा जावई गणेश कोमकर (Ganesh Komkar) आणि सोमा ऊर्फ सोमनाथ गायकवाड (Somnath Gaikwad) यांच्यासह अन्य आरोपींना एकमेकांशी संपर्कात आणण्यात महत्वाची भूमिका बजावणार्या मध्यस्थाला पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime Branch)
प्रसाद पांडुरंग बेल्हेकर Prasad Pandurang Belhekar (वय ३३, रा. नाना पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २२ जणांना अटक केली आहे. प्रसाद बेल्हेकर यांच्यावर आंदेकर टोळीतील (Andekar Gang) ऋषभ आंदेकर (Rishabh Andekar) याने हल्ला केला होता. त्याचा प्रसादला राग होता. गणेश कोमकर व प्रसाद बेल्हेकर यांचा परिचय आहे.
त्यातूनच कोमकर कुटंबीय आणि सोमा गायकवाड, तुषार कदम, समीर काळे व अनिकेत दुधभाते यांचा एकमेकांशी संपर्क होण्याकरीता दुवा म्हणून काम करुन व कटात सहभागी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
प्रसाद बेल्हेकर याला १९ सप्टेबर रोजी अटक केली असून न्यायालयाने अधिक तपासासाठी २४ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, (IPS Ranjan Kumar Sharma) अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त निखील पिंगळे (DCP Nikhil Pingle) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (PI Shabbir Sayyad), सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील (API Abhijit Patil), पोलीस अंमलदार शुभम देसाई, राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा