Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकर खून प्रकरणात फरार असलेल्या सागर पवार, साहिल दळवीला अटक; आतापर्यंत आरोपींकडून 8 पिस्तूल, 13 काडतुसे जप्त

Vanraj-Andekar

पुणे : Vanraj Andekar Murder | पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून (Firing In Nana Peth Pune) आणि कोयत्याने वार (Koyta Attack) करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आंदेकर खून प्रकरणात पसार झालेल्या सागर पवार, साहिल दळवीला गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) अटक केली. (Murder In Nana Peth Pune)

आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत तीन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे तर १८ जणांना अटक केली आहे. आरोपींकडून आठ पिस्तूल, १३ काडतुसे, सात दुचाकी, मोटार जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, शुभम दहिभाते, आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती प्रकाश, दीर गणेश यांंना अटक करण्यात आली.

या प्रकरणात कोयते, तसेच पिस्तूल पुरविणारा आरोपी संगम वाघमारेला नुकतीच अटक करण्यात आली होती. पसार झालेले आरोपी सागर पवार, साहिल दळवी यांना गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि खंडणी विरोधी पथकाने रात्री उशीरा अटक केली.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे,
सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, प्रताप मानकर,
उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, राहुल मखरे, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे व निलेश साबळे आणि पथकाने ही कारवाई केली आणि पथकाने ही कारवाई केली. (Vanraj Andekar Murder)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed