Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकर खून प्रकरणात हत्यारे पुरविणाऱ्या संगम वाघमारेला अटक

पुणे : Vanraj Andekar Murder | माजी नगरसेवक व आंदेकर टोळीतील (Andekar Gang) प्रमुख वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणात महत्वाची भूमिका बजावणारा व आरोपींना हत्यारे पुरविणार्यास पोलिसांनी अटक केली आहे.
संगम संपत वाघमारे Sangam Sampat Waghmare (वय २०, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला ११ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत १५ पुरुषांसह एक महिलेला अटक केली आहे. तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Vanraj Andekar Murder)
समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) दाखल असलेल्या या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट २ चे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रताप मानकर (PI Pratap Mankar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव, मोकाशी यांनी या गुन्ह्यामध्ये संगम वाघमारे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्याने वनराज आंदेकर याला मारण्यासाठी वापरलेले पिस्टल हे आरोपी आकाश म्हस्के व अनिकेत दुधभाते यांच्यासह घेऊन आल्याचे सांगितले. संगम वाघमारे याची हत्यारे आणणे व पुरविण्यात महत्वाची भुमिका बजावल्याने त्याला अटक करण्यात आली. (Pune Crime Branch)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा