Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकरच्या खुनाचा कट कोणी रचला? टीप कोणी दिली? बंडू आंदेकरने दिली माहिती

Bandu Andekar-Vanraj Andekar

पुणे : Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकर यांचा रविवारी रात्री नाना पेठेत पिस्तुलातून गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला (Murder In Nana Peth Pune). त्यांचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर Bandu Alias Suryakant Ranoji Andekar (वय ६८, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात (Samarth Police) तक्रार दिली. पोलिसांनी आतापर्यंत पंधरा आरोपींना अटक केली आहे, तर दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. वनराज आंदेकरच्या खुनाचा कट कोणी रचला? टीप कोणी दिली? याबाबत माध्यमांशी बोलताना बंडू आंदेकरने माहिती दिली आहे. (Bandu Andekar)

बंडू आंदेकर म्हणाला, ” संजीवनी जयंत कोमकर (वनराज आंदेकर यांची बहीण), जयंत कोमकर, प्रकाश कोमकर यांनी सोम्या गायकवाडशी हातमिळवणी केली होती. सर्वांनी मला आणि कृष्णराज आंदेकरला मारायचा कट रचला होता. मात्र, मला आणि कृष्णराज याला मारता येत नव्हते. त्यामुळे गणेश कोमकरने सोमनाथ गायकवाडच्या टोळीशी आर्थिक देवाण- घेवाण करून वनराज आंदेकर यांचा खून केला. (Andekar Gang)

नाना पेठेतील डोके तालीम चौकात (Doke Talim Chowk Pune) नेहमी वनराज उभे असायचे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाला वनराज मदत करायचे. त्यादिवशीही टोळक्याने पोरं वर्गणी मागण्यासाठी आल्याचे वनराज यांना वाटले. मात्र, टोळक्याने आल्या-आल्या थेट फायरिंग आणि कोयत्याने वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला,” असं बंडू आंदेकरने सांगितले.

“शेजारी पाणपोई असल्याने वनराज यांना पळता आले नाही. वनराज यांचा चुलत भाऊ शिवम आंदेकर यांना शंका आल्याने त्यांनी पळ म्हणून सांगितले होते. पण, हल्लेखोरांनी पहिली गोळी शिवमवर (Shivam Andekar) चालवली. ती गोळी शिवमने हुकवली. शिवम एका बाजूला, तर वनराज दुसऱ्या बाजूला पळाले,” असेही बंडू आंदेकरने म्हटले.

“वनराज यांची खरी टीप संजीवनी कोमकर आणि जयंत कोमकर यांनी गॅलरीत उभे राहून दिली होती. वनराज कुठे असतो, केव्हा बाहेर येतो, अंगावर कोणते कपडे घालतो, याचीही माहिती देण्यात आली होती. ही टीप मिळाल्यानंतर वनराज यांना घेरून खून करण्यात आला,” असं बंडू आंदेकर म्हणाला. (Vanraj Andekar Murder)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed