Vasant Chavan Passes Away | नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त
नांदेड : Vasant Chavan Passes Away | नांदेडचे खासदार (Nanded Congress MP) वसंत चव्हाण यांचे निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज सोमवार (दि.२६) पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला वसंतराव चव्हाण डायलसिस करत असत. पण नांदेडमध्ये आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीमुळे त्यांना नियमित आरोग्य चाचण्या करणे जमलं नव्हतं. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे.
यकृतामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे वसंत चव्हाण यांना सुरुवातीला नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. तसेच कमी रक्तदाबाचा त्रास ही होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर चव्हाणांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला नेण्यात आले होते.
मागील दोन दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधित्व केल्यानंतर
काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे वयाच्या सत्तरीत २०२४ मध्ये लोकसभेत निवडून आले होते.
१९५७ पासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्याच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले,
त्या मालिकेत सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणार्या वसंतरावांचे नावही घेतले जाते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय