Vasant More Vs MNS Leaders Pune | वसंत मोरेंच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल करण्याची मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी
पुणे : Vasant More Vs MNS Leaders Pune | शिवसेना नेते (Shivsena UBT) वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर मनसे नेत्यांनी त्यांच्याबाबत प्रतिक्रिया देणं प्रकर्षानं टाळलं होतं. मात्र आता पुण्यातील मनसे पदाधिकारी वसंत मोरे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विधानसभा अध्यक्ष सुधीर धावडे (Sudhir Dhwade) यांनी १० जुलै रोजी फेसबुक या समाज माध्यमावर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजा संदर्भात एक पोस्ट केली होती.
सदर पोस्ट वर अनेक कमेंट्स करण्यात आल्या. यातील काही कमेंट्स या अत्यंत हिन खालच्या पातळीवरील अश्लील व चरित्रहनन करणाऱ्या आहेत. सदर कमेंट्स या वसंत मोरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सहकारी करत असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला. वरील प्रकरणात सखोल तपास करून वसंत मोरे व त्याचे सहकारी यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
वसंत मोरेच्या विरोधात विनयभंग, चरित्रहनन आणि सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, माजी नगरसेवक बाबू गावस्कर, सुधीर धावडे, अश्विन चोरगे आदी उपस्थित होते.
सुधीर धावडे व त्यांचे कुटुंबीय हे मानसिकदृष्ट्या अतिशय अस्थिर झाले आहे.
तसेच सदर प्रकरणामुळे त्याच्या जीवाला धोका असल्याचे ही सुधीर धावडे यांनी यावेळी सांगितले.
वरील प्रकरणात सखोल तपास करून वसंत मोरे व त्याचे सहकारी
यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी ही मागणी केली असून
त्या नुसार कोथरूड पोलीस स्टेशनने (Kothrud Police Station) गुन्हा दाखल केला आहे.
परंतु या गुन्हाचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या वसंत मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मनसेची मागणी आहे. (Vasant More Vs MNS Leaders Pune)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक