VBA First Candidate List Of Vidhan Sabha | विधानसभेसाठी वंचितची ‘आघाडी’, 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Prakash-Ambedkar

मुंबई: VBA First Candidate List Of Vidhan Sabha | आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) घोषणा होण्यास अद्याप कालावधी आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती यांचं जागावाटप (Mahayuti Seat Sharing Formula) अंतिम टप्प्यात आहे. त्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने ‘आघाडी’ घेतली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत वंचितने जातीय समिकरण साधत सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग केला आहे.

https://www.instagram.com/p/DAK72NApqWE

यामध्ये रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली, नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव, खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.

https://www.instagram.com/p/DALIOdaiFUt

रावेर – शमिभा पाटील, सिंदखेड राजा – सविता मुंढे, वाशिम- मेघा किरण डोंगरे, धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम – विनय भांगे, साकोली – डॉ. अविनाश नन्हे, नांदेड दक्षिण- फारुक अहमद, लोहा – शिवा नरंगले, छत्रपती संभाजी नगर पूर्व – विकास दांडगे, शेवगाव – किसन चव्हाण, खानापूर – संग्राम माने याप्रमाणे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/DALMYNJCvFo

दरम्यान, “आमच्यावर काहीही आरोप होत असले तरी आम्ही राज्यात सध्या सर्वच प्रमुख पक्षांचे सुरू
असलेले एकजातीय राजकारण मोडून काढण्यासाठी विविध समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/DALLCN3CyU6

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्‍या गुन्हेगाराला अटक

Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)

You may have missed