Veena Dev Passes Away | ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वीणा देव यांचे निधन

Veena Dev

पुणे : Veena Dev Passes Away | ज्येष्ठ साहित्यिक आणि दुर्गप्रेमी गो. नी. दांडेकर यांच्या कन्या डॉ. वीणा विजय देव यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे दोन कन्या मृणाल, मधुरा, जावई, नातू, नातसून असा परिवार आहे. गेल्याच वर्षी त्यांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला होता.

डॉ.वीणा विजय देव या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख काम केलं. तेथे त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचं कार्य केलं. मराठी कथा-कादंबर्‍यांचे नाट्यरूपे या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून, या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

‘कधीकधी’, ‘परतोनी पाहे’, ‘स्त्रीरंग’, ‘विभ्रम’, ‘स्वामीचे दिवस’ हे त्यांचे लेखसंग्रह वाचकप्रिय आहेत. ‘स्मरणे गोनिदांची’ हा स्मरणग्रंथ आणि यशवंत देव आणि डॉ. ह. वि. सरदेसाई यांची वीणा देव यांनी संपादित केलेली दोन पुस्तकं आहेत. तसेच त्यांनी गो. नी.दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या आहेत. वीणा देव यांना मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वगौरव पुरस्कार देण्यात आला.

डॉ. वीणा देव ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. मुलाखती घेणे, सूत्रसंचालन याद्वारे त्यांचा आकाशवाणी, दूरदर्शनवर सहभाग राहिला आहे. १९७५ पासून गो. नी. दांडेकर लिखित विविध कादंबºयांच्या अभिवाचनाचे ६५० हून अधिक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. तसेच गो.नी.दा. यांच्या स्मरण-जागरणासाठी विजय देव यांच्या मदतीने त्या मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन, गो.नी.दा. यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन अशांसारखे अनेक उपक्रम राबवीत असतात. त्यांच्या मृण्मयी प्रकाशनातर्फे त्यांनी गो.नी.दा. यांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केलेल्या आहेत.

वीणा देव यांचे प्रा. विजय देव यांच्याबरोबर लग्न झाले होते. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून डॉ. विजय प्रल्हाद देव यांनी काम केले होते. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या वीणा देव व विजय देव यांच्या कन्या होत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पान टपरीतील चोरीच्या संशयावरुन तीक्ष्ण हत्याराने मारहाण करुन तरुणाचा खून

Purandar Assembly Election 2024 | पुरंदर मतदारसंघात काँग्रेसची पुनरावृत्ती की विजय शिवतारे गड जिंकणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Nirbhay Bano Campaigns | ‘निर्भय बनो’च्या सभा आता विधानसभेलाही होणार; मविआला सशर्त पाठिंबा; असीम सरोदे म्हणाले,”लाडकी नव्हे धाडसी बहीण योजना हवी”

Mantarwadi Pune Fire News | मंतरवाडीतील पेंटच्या गोडावूनला मध्यरात्री भीषण आग ! दोन टेम्पो, दोन दुचाकी ही आगीच्या भक्ष्यस्थानी (Video)