Vidhan Parishad Election 2024 | पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ताकद वाढली
पुणे : Vidhan Parishad Election 2024 | आज (दि.१२) रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पार पडले. जागा ११ आणि उमेदवार १२ दिल्याने या निवडणुकीत ट्विस्ट पाहायला मिळाला. घोडेबाजार होऊ नये यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीकडून (Mahayuti) काळजी घेण्यात आली. भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. भाजपाकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) २६ मतं, परिणय फुके (Parinay Phuke) २६ मतं ,अमित गोरखे (Amit Gorkhe) २६ मतं, योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) २६ मतं, सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) २४ मतं मिळवून विजयी झाले आहेत. दरम्यान योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांच्या विजयाने पुण्यासह (Pune BJP) पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) भाजपची ताकद वाढली आहे.
योगेश टिळेकर मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २ हजार ८२० मतांनी पराभूत झाले होते. २०१४ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा झालेला आहे. टिळेकर यांनी ‘भाजयुमो’चे प्रदेशाध्यक्ष पदही भूषविले आहे. यावेळी ते हडपसरमधून प्रबळ दावेदार होते (Hadapsar Assembly). विधानपरिषदेत ते आमदार म्हणून गेल्यामुळे पुण्यात भाजपची ताकद आणखी वाढलेली आहे. (Vidhan Parishad Election 2024)
तर पिंपरी चिंचवडमध्ये अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि महेश लांडगे (Mahesh Landge) हे भाजपचे आमदार आहेत.
तर, भाजपच्याच उमा खापरे विधानपरिषदेत आमदार आहेत.
आता अमित गोरखे हे विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत.
त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपची राजकीय ताकद वाढली आहे.
गोरखे यांच्या रुपाने भाजपला चौथा तर शहराला पाचवा आमदार मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अण्णा बनसोडे (Anna Bansode) पिंपरीचे प्रतिनिधित्व करत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड