Vidhan Parishad Election Results | विधानपरिषदेच्या निकाल जाहीर; महायुतीचे 9 तर मविआचे 2 उमेदवार विजयी

Vidhan Parishad Election Maharashtra BJP

मुंबई: Vidhan Parishad Election Results | विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकीत आपला विजय व्हावा, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. आज (दि.१२) विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडले. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता होती. सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावल्याने १२ पैकी कोण पराभूत होणार याची राजकीय वर्तुळात अधिक उत्सुकता होती. मात्र विधानपरिषदेच्या या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत.

भाजपाकडून पंकजा मुंडे २६ मतं, परिणय फुके २६ मतं ,अमित गोरखे २६ मतं, योगेश टिळेकर २६ मतं, सदाभाऊ खोत २४ मतं मिळवून विजयी झाले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून भावना गवळी २६ मतं, कृपाल तुमाने २५ मतं मिळवून विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर २३ मतं आणि शिवाजीराव गर्जे २४ मतं मिळवून दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.

काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव २५ मतं मिळवत विजयी झाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर २३ मतं मिळवत विजयी झाले आहेत तर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला असून त्यांना केवळ १२ मतं पडली आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने ९ उमेदवार उभे केले होते
तर विरोधी महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात होते.
पाच उमेदवारांसह भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले.
अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले.
काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला.
शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed