Vidya Chavan On Chitra Wagh | माझ्या सुनेच्या प्रकरणाला वेगळं वळण दिलं’; विद्या चव्हाणांनी ऐकवला चित्रा वाघ यांचा ऑडिओ; फडणवीसांवर आरोप
मुंबई: Vidya Chavan On Chitra Wagh | गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मदतीने चित्रा वाघ यांनी माझ्या सुनेला माझ्याविरोधात भडकवलं,असा सनसनाटी आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली सून आणि चित्रा वाघ यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली. कालच विद्या चव्हाण यांनी आपण उद्या पेनड्राईव्ह बॉम्ब टाकणार असल्याचे म्हंटले होते.
विद्या चव्हाण म्हणाल्या, ” माझ्या घरगुती प्रकरणाचा यांनी राजकारणासाठी वापर केला. महाले, अळवणी, मनीषा चौधरी यांच्या मार्फत राजकारण केलं गेलं. मी फडणवीस यांना भेटून सांगितलं या न्यायालयीन प्रकरणात येऊ नका, पण त्यांनी हे केलं.
माझ्यावर ईडी, आयटीच्या धाडी टाकता येत नाही. मला अटक करता येत नाही. मी बेरोजागरी, महागाई विरोधात बोलते म्हणून मला असा त्रास दिला जात आहे. भाजपने माफी मागितली पाहिजे. चित्रा वाघ यांनी लक्षात ठेवावं हे त्यांच्या घरातही होऊ शकतं. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं याची दखल घ्यावी, अशी मागणीही यावेळी विद्या चव्हाण यांनी केली. (Vidya Chavan On Chitra Wagh)
विद्या चव्हाण यांनी ऑडिओ क्लीप ऐकवल्यानंतर चित्रा वाघ यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत विद्या चव्हाणांनी सुनेवर कसा अन्याय केला हे सांगितले.
पण त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सांगत विद्या चव्हाण यांनी म्हटलं की, “चित्रा वाघ धडधडीत खोटं बोलत आहेत.
त्यांनी माझ्याशी चर्चा करावी माझ्या सुनेला घेऊन यावं. माझ्या घरचा पत्ता तिला माहिती आहे. ती चुकीची माहिती देत आहे.
कोर्टानं सांगितलेलं आहे की कौटुंबिक हिंसाचाऱ्यांची घटना नाही,”
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश