Vijay Shivtare | बाप-लेकीच्या नात्याला सलाम! आमदार विजय शिवतारे यांना लेकीने दिली किडनी

Vijay Shivtare | Salute to father-daughter relationship! Daughter donates kidney to MLA Vijay Shivtare

Vijay Shivtare | मुलगी आणि वडील यांचं नातं हे जगातील सर्वात सुंदर, निस्वार्थी आणि प्रेमळ नात्यांपैकी एक मानलं जातं. याच अनमोल नात्याचं हृदयस्पर्शी उदाहरण सध्या महाराष्ट्रासमोर आलं आहे. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना त्यांच्या कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी किडनी दान करून नवजीवन दिलं आहे.

मुंबईत सोमवारी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर आमदार विजय शिवतारे आणि डॉ. ममता शिवतारे या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

गेल्या काही दिवसांपासून किडनी निकामी झाल्यामुळे आमदार शिवतारे डायलिसिसवर होते. त्यांची प्रकृती खालावत असताना, मुलगी डॉ. ममता पुढे सरसावल्या आणि त्यांनी किडनी दान करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीमुळे बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि जिव्हाळा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी आमदार शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्या वेळीही त्यांच्या मुलीनेच खंबीरपणे साथ दिली होती. आता पुन्हा एकदा वडिलांना नवजीवन देत डॉ. ममता शिवतारे यांनी केवळ आपल्या कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण समाजालाही प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत असून, अनेकजण त्यांना खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ म्हणत आहेत. एका लेकीचा हा त्याग, प्रेम आणि माणुसकीचा संदेश महाराष्ट्रभर पोहोचत आहे.

You may have missed