Viman Nagar Pune Crime News | विमाननगरमध्ये पत्रकारांना मारहाण करुन लुबाडण्याचा प्रयत्न; गुन्हे शाखेच्या युनिट 4 कडून एकाला अटक

Pune Crime Branch

पुणे : Viman Nagar Pune Crime News | कारची लाईट डोळ्यावर पडल्याने चौघांनी पत्रकारांना मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. विमाननगरमधील खुळेवाडी येथील मोकळ्या मैदानात हा प्रकार २१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता घडला होता़ गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने त्यातील एकाला अटक केली आहे. (Pune Crime Branch News)

सोमनाथ मोहन कांबळे (वय २७, रा. खुळेवाडी, जय हनुमान मित्र मंडळ, विमाननगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत अंकुर सतिशचंद्र दुबे (वय ३२, रा. दुबे सदन, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Arrest In Robbery Case)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दिवस रात्री या हिंदी वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून काम करतात. ते व त्यांचे मित्र अभिषेक शुक्ला हे कारने खुळेवाडी येथील मोकळ्या मैदानात २१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता गेले होते. त्यावेळी मैदानामध्ये दोघे जण बसले होते. त्यांच्या चेहर्‍यावर गाडीचा लाईट पडल्याने त्यांनी लाईट बंद करण्याचा इशारा देऊन शिवीगाळ केली. तेव्हा फिर्यादी यांनी गाडी उभी करुन शिवीगाळ का करतो, असे विचारले. त्याचा त्यांना राग आला. त्यामुळे ते वाद घालू लागले. त्यांनी इतर दोघांना बोलावुन घेतले. (Viman Nagar Pune Crime News)

त्या चौघांनी शिवीगाळ करीत फिर्यादी व त्यांचा मित्र अभिषेक शुक्ला यांना लाथाबुक्यांनी पोटात, डोक्यात, पाठीवर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एकाने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन जोरात खेचली असता चैन तुटली व ती जॅकेटमध्येच अडकून राहिली. चैनला असलेले ४५ हजार रुपयांचे पॅडल त्यांनी हिसकावून घेतले. आजुबाजुची लोक जमा होऊन त्यांनी भांडणे सोडविली. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार विनोद महाजन
व पोलीस अंमलदार नागेश सिंह कुवर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,
विमानतळ पोलीस ठाण्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सोमनाथ कांबळे
हा खुळेवाडी येथे थांबला आहे. या बातमीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने तेथे जाऊन
सोमनाथ कांबळे याला पकडले. त्याची वैद्यकीय चाचणी करुन पुढील तपासासाठी त्याला विमानतळ
पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)

Pune Crime News | कुर्डवाडीहून पुण्यात येऊन रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या

You may have missed