Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

Arrest

पुणे : Viman Nagar Pune Crime News | खुळे वाडी येथील मैदानात गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला (Criminal On Police Record) विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) अटक केली आहे. भारत माणिक पवार Bharat Manik Pawar (वय ३३, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, खुळेवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून २३५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस शिपाई योगेश थोपटे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गुरुवारी रात्री विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पेट्रोलिंग करण्यास जात होते. त्यावेळी लोहगाव, खुळेवाडी येथे गेले असताना रस्त्याच्या कडेला रेकॉर्डवरील गुन्हेगार भारत पवार हा रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांची गाडी पाहून तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २३५ ग्रॅम गांजा आढळून आला. विक्री करण्यासाठी तो तेथे थांबून ग्राहकांची वाट पहात असल्याचे त्याने सांगितले. पोलीस उपनिरीक्षक संदिप करपे (PSI Sandeep Karpe) तपास करीत आहेत. (Viman Nagar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chhatrapati Shambhu Raje Rajyabhishek Trust | प्रसिध्दीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांची अस्मिता जपावी; छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टची मागणी

Catalyst Foundation Pune | डीजे, लेझर लाईट वापरणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करा; सुनील माने यांचे सह पोलीस आयुक्तांना निवेदन

Parvati Pune Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून वारंवार पाठलाग करुन रिक्षाचालकाने केला विनयभंग

Warje Malwadi Pune Crime News | ‘गाडी नीट चालवता येत नाही’ म्हणून तिघांनी केली दोघा भावांना मारहाण