Viman Nagar Pune Crime News | सिंगापूर -पुणे विमानात बॉम्बधारक प्रवासी असल्याच्या मेसेजने खळबळ ! विस्तारा एअरलाइन्सच्या हरियाना कार्यालयात धमकी
पुणे : Viman Nagar Pune Crime News | सिंगापूरहून पुण्याला येणार्या विमानात बॉम्बधारी प्रवासी असल्याचे ट्विट करण्यात आल्याचे एकच खळबळ उडाली होती. तपासणीनंतर हा कोणीतरी खोडसाळपणा केल्याचे निष्पन्न झाले. (Viman Nagar Pune Crime News)
याबाबत मुनिष नरदेवसिंग कोतवाल (वय ४३, रा. टिंगरेनगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिझोफेनिया १११ schizophrenia111 @schizophreniqq q असे ट्विटर अकाऊंट वापरकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सिंगापूर ते पुणे विमान प्रवासादरम्यान ट्विटरद्वारे रविवारी दुपारी दीड वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिझोफेनिया १११ या ट्विटर अकाऊंटवरुन विस्तारा एअरलाईन्सच्या हरियाना येथील कार्यालयात धमकीचा हा मेसेज मिळाला होता. त्यावेळी सिंगापूरहून विमानाने पुण्याच्या दिशेने उड्डाण केले होते. या मेसेजमध्ये १२ जण विमानात असून त्यापैकी ६ जण तुमच्या विमानात बॉम्बसह आहेत. फ्लाईट यु के २५, फ्लाईट यु के १०६, फ्लाईट युके १४६, फ्लाईट युके ११६, फ्लाईट युके ११०, फ्लाईट युके १०७ (प्रत्येकी २ जण) सर्व जण संपणार आहेत. असा मेसेज मिळाला.
12 MEN ARE ON BOARD OF 6 OF YOUR PLANS WITH BOMBS, (02 ON EACH) FLIGHT UK25, FLIGHT UK 106, FLIGHT 146, FLIGHT UK 116, FLIGHT UK 110, FLIGHT UK 107 EVERYONE WILL END UP IN A GRAVE
या मेसेजमधील युके ११० ही सिंगापूर ते पुणे अशी फ्लाईट त्यावेळी आकाशात होती.
यामुळे या विमानातील प्रवासी, तसेच एअरपोर्ट परिसरातील नागरिक व प्रवाशांमध्ये खोटी माहिती
व अफवा पसरवून भितीदायक वातावरण निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस उपनिरीक्षक करपे तपास करीत आहेत.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?