Viman Nagar Pune Crime News | धक्कादायक! अॅक्सिस बँकेचा डेटा चोरुन मागितली खंडणी; कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्याचे कृत्य, कंपनीमध्ये 20 टक्के हिस्सा, 25 लाखांची खंडणीची मागणी
पुणे : Viman Nagar Pune Crime News | अॅक्सिस बँकेकरीता (Axis Bank) संपूर्ण भारतभर कलेक्शन सर्व्हिसेस पुरविण्याचे काम करणार्या कंत्राटदार कंपनीच्या कर्मचार्याने कंपनीचा मास्टर पासवर्ड, बँकेचा डेटा, कामगारांचा डेटा चोरुन खंडणी (Extortion Case ) मागितल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या या कर्मचार्याने कंपनीमध्ये २० टक्के हिस्सा व २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्यानंतर आता दीड वर्षानंतर कंपनीने पोलिसांकडे धाव घेतली आहे.
याबाबत सुब्रम्हयम अरुणमुघम कोनार (वय ४४, रा. पॅलेडिअम, एक्झॉटिका, माधवनगर, धानोरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी श्रवण अजित कोरडे Shravan Ajit Korde (रा. मधुकाश अपार्टमेंट, धायरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार विमाननगरमधील साकोरेनगर येथील रेडियंट कॅप्टिव्ह इंडिया प्रा. लि. (Radiaant Captive (India) Private Limited) या कंपनीत २०२० ते १४ जुलै २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडियंट कॅप्टिव्ह ही कंपनी अॅक्सिस बँकेकरीता संपूर्ण भारतभर कलेक्शन सर्व्हिसेस पुरविण्याचे काम करते. या कंपनीत श्रवण कोरडे हा कामाला होता. त्याला कंपनीने कामावरुन काढून टाकले. कंपनीत कामाला असताना त्याने कंपनीच मास्टर पासवर्ड, बँकेचा डेटा, कंपनीतील कामगारांचा डेटा इत्यादि माहिती चोरली. कंपनीचे भागीदार महेश कोलमकर यांना व्हॉटसअॅप कॉल्द्वारे ही माहिती त्याचे असल्याचे सांगून तुम्ही मला ५ लाख रुपये दिले नाही तर तुम्हाला खुप जड जाईल, अशी धमकी दिली. त्यानंतर कोरडे याच्याशी कंपनीकडून चर्चा केली जात होती. त्यामध्ये त्याने कंपनीमध्ये २० टक्के हिस्सा व २५ लाख रुपये द्या अशी खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर कंपनीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली.
दरम्यान, कंपनीतील सर्व कर्मचार्यांचे मे आय डी चे पासवर्ड त्याने स्वत: कडे घेऊन ते बदलले. त्यामुळे कंपनीतील सर्व कर्मचार्यांना त्रास सहन करावा लागला. यातून मार्ग न निघाल्याचे शेवटी कंपनीकडून पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले (PSI Chetan Bhosale) तपास करीत आहेत. (Viman Nagar Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune PMC News | नगरसेवक नसल्याने पुणे महापालिकेचा ‘स्वैर’ कारभार !
पर्यावरण पूरक प्रकल्प राबविणार्यां मिळकत धारकांमागेच प्रशासनाचा ‘तगादा’
Pune Police MPDA Action | धडाकेबाज ! अवघ्या 11 महिन्यात MPDA कारवाईचे शतक;
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 103 अट्टल गुन्हेगारांना केले स्थानबद्ध