Viman Nagar Pune Crime News | रिक्षाचालकाला लुटणार्‍या तिघांना अटक ! प्रवासी म्हणून आडबाजूला नेऊन लुटले, सीसीटीव्हीमध्ये झाले कैद

pune-police-arrest

पुणे : Viman Nagar Pune Crime News | प्रवासी म्हणून रिक्षा बसून फॉरेस्ट पार्क रोडवरील मोकळ्या मैदानात नेऊन रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणार्‍या तिघांना विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) अटक केली आहे.

करण विनायक शिर्के (वय ३०, रा. लोहगाव), सिद्धार्थ दत्तू जाधव (वय २३, रा. योजनानगर, लोहगाव – वाघोली रोड), आकाश हरेंद्र शर्मा (वय २०, रा. पवारवस्ती, लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मारुती माधवगिरी (वय २६, रा. साडेसतरा नळी, हडपसर) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोहगाव येथील फॉरेस्ट पार्क रोडवरील (Forest Park Road Lohegaon) मोकळ्या मैदानात सोमवारी पहाटे ४ वाजता घडला होता. (Arrest In Robbery Case)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्रपाळीला रिक्षा व्यवसाय करत होते. खांदवेनगर येथे ते प्रवाशांची वाट पहात असताना तिघे जण रिक्षात प्रवासी म्हणून बसले. त्यांनी लोहगावला रिक्षा घेण्यास सांगितली. वाटेत त्यांना दमदाटी करुन फॉरेस्ट पार्क रोडवरील मोकळ्या मैदानात रिक्षा घेण्यास सांगितले.

तेथे गेल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली. अंगाने जाड असलेल्या आरोपीने त्याच्या हातातील
कडे डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. त्यांच्याकडील ५ हजार २००रुपये व मोबाईल
जबरदस्तीने काढून घेऊन ते पळून गेले. या गुन्ह्यातील माहिती
होताच विमानतळ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
त्यात एक दोन ठिकाणी हे आरोपी कैद झाले होते. त्यावरुन पोलिसांनी तिघांना अटक केली.
सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करीत आहेत.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती

Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्‍या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’

You may have missed