Viman Nagar Pune Crime News | बनावट विमान तिकीट बनवून विमानतळावर शिरणार्‍या तरुणाला अटक; वडिल लखनौला तर मुलगा पोलीस कोठडीत, एजंटावर गुन्हा दाखल

Salim Gole Khan

पुणे : Viman Nagar Pune Crime News | वडिल लखनौला जात असताना त्यांच्या सोडण्यासाठी आलेल्या मुलाने पुणे ते लखनौचे बनावट विमान तिकीट तयार केले. त्या तिकीटावर विमानतळावर प्रवेश केल्याने विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) त्याला अटक केली आहे. त्याला तिकीट बनवून देणार्‍या एजंटावर गुन्हा दाखल केला आहे. वडिलांचे तिकीट अधिकृत असल्याने ते नियोजित वेळेनुसार इंडिगोच्या विमानाने लखनौला गेले अन मुलगा पोलीस कोठडीत गेला.

सलीम गोले खान Salim Gole Khan (वय २७, रा. विद्यानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. नसरुद्दीन खान (रा. नवाबगंज, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोहगाव येथील पुणे विमानतळावर रविवारी पहाटे पावणेतीन वाजता घडला.

याबाबत तुषार विश्वनाथ अंधारे (वय ३२, रा. धानोरी) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी (PI Ajay Sankeshwari) यांनी सांगितले की, सलीम खान यांचे वडिल लखनौला जाणार होते. त्यांना सोडण्यासाठी सलीम हा विमानतळावर आला होता. इंडिगो एअरलाईन्यचे त्यांचे विमान होते. त्याच्या वडिलांकडील विमान तिकीटाचा पीएनआर नंबर जुळला. पण सलीमकडील विमान तिकीटाचा पीएनआर नंबर जुळत नव्हता. (Viman Nagar Pune Crime News)

त्यामुळे विमानतळावरील कर्मचार्‍यांनी तिकीटाची तपासणी केली. तेव्हा ते तिकीट बनावट असल्याचे लक्षात आले.
इंडिगो एअरलाईन्सने ही घटना पोलिसांना कळविली.
सलीम यांच्या वडिलांचे तिकीट अधिकृत असल्याने ते विमानाने लखनौला रवाना झाले.
पोलिसांनी सलीम खान याला अटक केली असून त्याला बनावट तिकीट तयार करुन देणार्‍या एजंटावर गुन्हा दाखल केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 150 पेक्षा अधिक जागांवर लढण्याचा निर्धार ; बैठकीत मोठा निर्णय

Newly Married Couple Suicide | अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन् संपवलं जीवन

Instagram Love Story | पंजाबच्या तरुणीचं रत्नागिरीच्या तरुणाशी इन्स्टावर प्रेम जडलं; पंजाबवरून रत्नागिरी गाठली अन्…

Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

You may have missed