Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”
दिल्ली: Vinesh Phogat | पॅरिस ऑलिम्पिक मधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीला अलविदा केले आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. फोगटने पोस्ट मध्ये म्हंटले आहे की , ” आई, माझ्याकडून कुस्ती जिंकली, मी हरले, माफ करा, तुझे स्वप्न, माझे धैर्य, सर्व काही तुटले आहे, आत माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. कुस्ती २००१-२०२४ ला अलविदा, मी ऋणी राहीन”, असे फोगटने पोस्टमध्ये म्हंटले आहे.
विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जोरदार खेळी करुन फायनल पर्यंत पोहोचली होती. फोगटने तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना ५-० च्या फरकाने जिंकला होता. ऑलिम्पिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. विनेश फोगाटने निवृत्ती जाहीर केल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्याने लिहिले की, “विनेश, तू पराभूत झाली नाहीस, तुला पराभूत केलं, तू आमच्यासाठी नेहमीच विजेता राहशील, तू भारताची कन्या आहेस तसेच भारताचा अभिमान आहेस.”, कुस्तीपटू बजरंग पुनियाने असंही पोस्टमध्ये म्हटले आहे.
विनेश फोगटचं वजन फायनल मॅचपूर्वी १०० ग्रॅम अधिक आढळले ज्यामुळे विनेशला स्पर्धेतून अपात्र घोषित करण्यात आले. याबाबत भारतीय कुस्ती संघाकडून अपील करण्यात आलं होतं.
विनेश रात्रभर तिचं वजन नियंत्रित करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत होती
परंतु सकाळी तिचं वजन १०० ग्रॅम अधिक असल्याचं निदर्शनास आले.
तर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन IOA ने विनेशला आणखी थोडा वेळ आणि सूट दिली जावी
असं भारताने म्हटलं. मात्र स्पर्धेचे काही नियम असतात ते बदलले जाऊ शकत नाहीत असे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे अध्यक्ष नेनाद लालोविच यांनी स्पष्ट केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी