Vishalgad Encroachment | “विशाळगडावर दहशतवादी राहून गेलाय”; गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजीराजेंचा खळबळजनक आरोप

Vishalgad Encroachment

कोल्हापूर : Vishalgad Encroachment | विशाळगडावरील अतिक्रमणावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर काल विशाळगड परिसरात मोठी दगडफेक झाली. यानंतर आता शाहुवाडी पोलिसांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत (Sambhaji Raje). संभाजीराजे छत्रपती यानंतर प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडताना विशाळगडावर दहशतवादी राहून गेल्याचे म्हणत खळबळजनक दावा केला आहे.

ते म्हणाले, ” गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटावे ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. हा विषय मी जरा उशीरा हाती घेतला आहे. विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. इथे उघड्यावर कोंबड्या कापल्या जात आहेत. इथले स्थानिक आमदार हे या सरकारसोबत आहेत त्यांनी या अतिक्रमणला खतपाणी घातले आहे. एकही नेता गडकोट विषयी बोलत नाही. सर्वजण मलाच त्रास देत आहेत.” असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना संभाजीराजे यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे.
ते म्हणाले की, ” यासिन भटकळ हा कुख्यात दहशतवादी विशाळगडावर सहा दिवस राहून गेला आहे.”
त्यांच्या या आरोपांमुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Vishalgad Encroachment)

१२ राज्यांच्या दहशतवादविरोधी एजन्सीच्या आरोपपत्रानुसार भटकळचा जर्मन बेकरीसह देशभरात किमान १० दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग आहे.
दिल्लीच्या बाजारपेठेतील साखळी बॉम्बस्फोटांचाही तो मास्टरमाईंड होता.
मुंबई लोकल, बंंगळुरू, जयपूर, वाराणसी, सुरत येथे झालेल्या बॉम्बस्फोटातीलही तो आरोपी आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार