Vishalgad Encroachment | विशाळगडावर संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांचा धुडगूस; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Prakash Ambedkar-Sambhaji Bhide

मुंबई : Vishalgad Encroachment | माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी गडावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत त्यांनी आपल्या समर्थकांना चलो विशाळगडचा नारा दिला होता. पण संभाजीराजे विशाळगडावर पोहचण्यापूर्वीच तेथिल परिसरात हिंसाचार झाला. तेथिल घरे आणि दुकानांची जाळपोळ झाली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखी तणाव निर्माण झाला होता.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह इतरांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आता या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. यावरूनच आता वंचितचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Vishalgad Encroachment)

प्रसारमाध्यमांसमोर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “विशाळगडावर अतिक्रमण झाले हे खरे आहे.
पण अतिक्रमण हटवताना शासनाने त्या लोकांचे पुनर्वसन करावे लागते असा नियम आहे.
विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे आंदोलन करत असताना आमच्या माहितीप्रमाणे संभाजी भिडे यांचे सैन्य म्हणजेच धारकऱ्यांनी धुडगूस घातला अशी आमची माहिती आहे.
आणि जाणून बुजून तिथल्या लोकांना मारझोड करण्यात आली त्यांची दुकाने तोडली.” असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed