Vishrantwadi Pune Crime News | ‘तो’ इन्स्टाग्रामवर स्टेटसला त्यांचे फोटो ठेवून वाहत होता श्रद्धांजली ! ‘अमोल’ने एकतर्फी प्रेमातून केला ‘गौरी’चा खून; वाचा संपूर्ण स्टोरी

पुणे : Vishrantwadi Pune Crime News | तो गौरी आणि तिचा पती लणेश यांचे फोटो इन्स्टाग्रामवर स्टेटसला ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहत होता. त्याने गौरीला, तिच्या पतीला, तिच्या दोन भावांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. घटनेच्या दिवशी तो त्यांच्या घराभोवती फिरताना दिसला होता. अमोल कांबळे हा वारंवार धमकी देत होता, तरीही त्याची पोलिसांना वेळेत माहिती न दिल्याने गौरीला आपले प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. (Murder Due To One Sided Love)
https://www.instagram.com/p/DAFzMIRp2V0
अमोल कांबळे याने एकतर्फी प्रेमातून गौरी आरे हिच्या डोक्यात कोयत्याने वार (Koyta Attack) करुन तिचा खून केला. अमोल कांबळे विषयी गौरी हिने आपले पती लणेश आरे याला सांगितले होते. घटना घडण्यापूर्वी दुपारी सव्वा वाजता तिने फोन करुन अमोल कांबळे हा घराचे जवळ येऊन घराभोवती फिरुन गेला आहे,असे सांगितले होते. तेव्हा तिचे पती लणेश आरे यांनी गौरी हिला तू घाबरु नको, तो काही बोलला तर लगेच मला फोन कर, मी लगेच येतो, असे सांगितले होते. त्यानंतर रात्री सव्वा आठ वाजता गौरी ही मैत्रिणीबरोबर घरी येत असताना ट्रिनिटी स्कुलसमोर (Trinity School Kalas) अमोल कांबळे याने पळून येऊन गौरीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तिला गंभीर जखमी केले. उपचार सुरु असताना दुसर्या दिवशी सकाळी गौरीचा मृत्यु झाला.
https://www.instagram.com/p/DAFxEh9p-HA
लणेश धनाजी आरे (वय २४, रा. लक्ष्मीकुंज सोसायटी, कळस माळवाडी, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (VishrantWadi Police Station) दिलेल्या फिर्यादीवरुन हे सर्व समोर आले आहे.
https://www.instagram.com/p/DAFu_H9NrAI
गौरी आणि फिर्यादी लणेश आरे यांची २०२२ मध्ये कामाचे निमित्ताने ओळख झाली. ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. दोघांनी २ मार्च २०२२ रोजी बीड येथे लग्न केले. गौरीने लग्नाच्या वेळीच लणेश यांना माझे वर्गात शिकणारा मुलगा अमोल कांबळे हा माझ्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तो माझ्यासोबत लग्न करण्यासाठी माझे मागे लागला होता. परंतु, माझी त्याचे सोबत लग्न करण्याची इच्छा नसल्याने मी त्यास तुझ्यासोबत लग्न करणार नाही, असे सांगितले होते. त्या कारणावरुन अमोल मला सतत त्रास देता होता, असे गौरीने सांगितले होते.
त्यांचे लग्न झाल्यावर ते बीड येथे रहात होते.
https://www.instagram.com/p/DAFjxRCJoyk
त्यांचे लग्न झाल्यानंतर अमोल कांबळे हा सतत लणेश व गौरीचे फोटो भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून इन्स्ट्राग्रामवर स्टेटसला ठेवत होता. त्याबद्दल फिर्यादी लणेश यांनी एक दोन वेळा अमोल याला फोन करुन तू आमच्याबाबत असे स्टेटस का ठेवतो, असे विचारले असता तो मी तुला, गौरीला, तिच्या दोन भावांना जिवंत सोडणार नाही, असे बोलत असे.
https://www.instagram.com/p/DAD3BxzJwAD
लणेश व गौरी आरे यांना दीड वर्षाचा गौरांश हा मुलगा आहे. लणेश आरे यांना कोरेगाव पार्क (Koregaon Park Pune) येथील मोनिष अरोरा यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळाल्याने ते तीन महिन्यांपूर्वी पुण्यात आले. मेव्हणा अक्षय प्रदीप देवळेकर यांच्या कळस माळवाडी येथील घरी रहायला आले होते. तेव्हापासून अमोल कांबळे हा अधून मधून ते रहात असलेल्या घराचे भोवती फिरुन जात असे. परंतु, तो असे काही करेल, हे त्यांना वाटले नव्हते.पण, त्याच्या डोक्यात शिरलेल्या रागाची त्यांना कल्पना आली नाही. त्याची परिणिती गौरीच्या मृत्युत झाली. (Vishrantwadi Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DADq4pVizoC
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा